भोयरे गांगर्डा, कडूस परिसरात पाण्यासाठी वन्यजीवांचा संघर्ष

संग्रहित छायाचित्र

सुपे – दुष्काळामुळे भोयरे गांगर्डा, कडूस, पळवे येथील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला तर दूसरीकडे वन क्षेत्रातील मुके जीव पाण्यासाठी संघर्ष करताना मानवी वस्तीकडे धाव घेत असल्याचे चित्र परिसरात दिसत आहे.

कडूस, पळवे, भोयरे गांगर्डा या ठिकाणी वनक्षेत्र असून, यामध्ये 300 हून अधिक हरीण, काळवीट आदी प्राण्यांचे वास्तव्य आहे. त्यांच्याही चारा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हे प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत असून, जिथे पाणी आहे त्या शेतकऱ्यांचे उभी पिके रातोरात खाऊन फस्त करत आहेत.

“यंदा पावसाने पाठ फिरविल्याने वन खात्याने पाणीटंचाईची गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात वनक्षेत्रात असलेल्या पाणवठयात पाणी उपलब्ध करण्यासाठी टॅंकरचा प्रस्ताव पाठवला आहे. तसेच आवश्‍यक असणाऱ्या इतर उपाय योजनाचांही अवलंब करण्यात येईल.
– मनीषा भिंगे, वनपरिक्षेत्र अधिकारी पारनेर

वनक्षेत्रामध्ये पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. यावर्षी पाऊस न पडल्याने पाणी नाही. त्यामुळे रानडूक्कर, हरिण, काळविट, ससे, तरस, कोल्हे यासह अनेक वन्यप्राणी पाण्याच्या शोधार्थ रानोमाळ फिरतांना दिसत आहेत.

“जलसंकटांचा फटका वनक्षेत्राला बसला असुन, वन्य जीवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. परिणामी ते गावाकडे कूच करतात आणि त्यातुन, मानव-वन्यजीव संघर्ष सुरू होतो. हा संघर्ष व प्राण्याचां जीव वाचवन्यासाठी वनक्षेत्रात पाण्याची तातडीने व्यवस्था करावी.
– संतोष गायकवड, वन्यप्रेमी कडुस

अत्यल्प पावसामुळे पुढील तब्बल सहा महिने जंगलात पाणीटंचाई राहणार आहे. हे प्राणी नागरी वस्त्यांकडे धाव घेत असल्याने नागरी जीवनात असुरक्षितता निर्माण झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)