वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरूच!

पारनेर तालुक्‍यातील वाढत्या औद्योगिक क्षेत्रात बाबुर्डी म्हसणेफाटा रोडवरील खड्यात पडलेल्या हरणांचे प्राण वाचताना वन्यप्रेमी. 

पंधरा फूट खड्यात पडलेल्या हरणांचे वाचवले प्राण

सुपे – वनविभागाच्या ढिसाळ कारभाराचा फटका वन्य प्राण्यांना वारंवार बसत आहे. यापूर्वीदेखील अनेक प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी आपला जीव गमवावा लागला आहे, याकडे मात्र वन विभागाचे दुर्लक्ष होत असून वन्यप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पारनेर तालुक्‍यातील विस्तारीत औद्योगिक श्रेत्रात बाबुर्डी, म्हसणे फाटा रोडचे काम चालू आहे. लाईटच्या पोलसाठी बनविलेल्या पंधरा फूट खोल खड्ड्यात बुधवारी (दि.24) पडलेल्या हरणांचे प्राण वाचविण्यात वन्यप्रेमी व भोयरे गांगर्डाचे ग्रामरोजगार सेवक मोहन पवार, दादा सातपुते व त्यांच्या सहकार्याला यश आले. हा प्रकार सकाळी बारा वाजता घडला.

आपल्या कामासाठी निघालेल्या परिसरातील गुरे चारणाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तेथील कामगारांच्या मदतीने खाली उतरून हरणास रस्सीने बांधून वर काढले. त्यास पाणी पाजले व थोडेसे खरचटून जखमी झालेल्या हरणाला परिसरात सोडून देण्यात आले.

यादरम्यान उपस्थितांनी वनाधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता, घटनास्थळी येतो असे उत्तर देऊन वेळकाढूपणा केला. औद्योगिक वसाहत प्रगतीपथावर असताना वन्यप्राणी पाण्यासाठी भटकत आहेत. यापूर्वीदेखील शेतकरी कल्याणकारी संस्थेतर्फे वनविभागाला निवेदन देवून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे. मात्र याकडेदेखील वनविभाग डोळेझाक करत आहे.

तालुक्‍यात भयंकर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. बाबुर्डी, भोयरे गांगर्डा, पळवे भागात डोंगराळ भाग असल्याने परिसरात वन्यप्राण्यांचे मोठ्या प्रमाणात वास्तव आहे. चालू वर्षी पाऊस अल्प प्रमाणात पडल्यामुळे डोंगरावरील चारा नामशेष झाला आहे. तुरळक ठिकाणी वन विभागातर्फे पाणवठे बांधण्यात आले आहेत. मात्र त्यामध्ये पाणी सोडले जात नसून हरणांसह इतर प्राणी लोकवस्ती जवळ पाण्यासाठी भटकंती करताना दिसतात. परिसरातून नगर-पुणे महामार्ग गेलेला आहे, या महामार्गावर अनेक वेळा या प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.

बुधवारीदेखील अशा प्रकारे पाण्याच्या शोधात भर उन्हात आलेले हे हरीण नक्कीच पाण्यासाठी त्या कॉंक्रिटच्या खड्यात डोकावत असताना पडले असावे असा अंदाज दादा सातपुते यांनी व्यक्त केला. वाढती उष्णता कोरडे पडलेले गळके पानवठे याचा विचार करता वन्यप्राण्यांसाठी नव्याने पानवठे उभारावे अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांमधून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)