उद्योगपूरक धोरणांमुळे महाराष्ट्र नव्या उंचीवर : देवेंद्र फडणवीस

सुपे (ता. पारनेर) : येथील औद्योगिक वसाहतीमध्ये नव्याने सुरू होणाऱ्या माइडिया कंपनीच्या पार्कचे दीप्रज्ज्वलन करून उद्‌घाटन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. समवेत उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिंगजियान, पॉल फांग आदी.

राज्यात एक हजार 350 कोटींची गुंतवणूक

सुपे – उद्योगपूरक धोरणांमुळे महाराष्ट्र गुंतवणुकीची नवनवी शिखरं प्राप्त करीत आहे. आज देशात जितकी परकीय गुंतवणूक येते, त्याच्या 49 टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात येत आहे. माइडिया टेक्‍नॉलॉजी पार्कच्या माध्यमातून सुपे व पारनेर परिसरात रोजगाराच्या संधी निर्माण होतील, याची मला पूर्ण खात्री आहे. आपल्याकडे कुशल मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे गुंतवणुकीत वाढ होत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पारनेर तालुक्‍यातील सुपे औद्योगिक वसाहतीमध्ये माइडिया टेक्‍नॉलॉजी पार्कच्या पायाभरणी समारंभ मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार दिलीप गांधी, आमदार विजय औटी, शिवाजी कर्डिले, मायडिया समूहाचे संस्थापक शिंगजियान, अध्यक्ष पॉल फंग आदी यावेळी उपस्थित होते.

यापूर्वी इज ऑफ डुईंग बिझनेसच्या मानांकनात भारत 142 व्या स्थानी होता, आता तो 77 व्या क्रमांकावर आला आहे. या उपलब्धीत महाराष्ट्राचा वाटा फार मोठा आहे. महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची हीच खरी योग्य वेळ आहे, असे आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ धोरणाशी सुसंगत राखत येत्या पाच वर्षांत अंदाजे 1 हजार 350 कोटी रुपयांची गुंतवणूक करुन टेक्‍नॉलॉजी पार्क स्थापन करण्याचे माईडियाचे नियोजन आहे. या टेक्‍नॉलॉजी पार्क मधून दोन हजारांहून अधिक लोकांसाठी रोजगाराच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संधी निर्माण होणे अपेक्षित आहे. 2020 सालाच्या सुरुवातीला या संकुलातून पूर्ण क्षमतेने काम सुरू होईल.

शिंगनियान म्हणाले, भारतातील नवीन अस्थापनांचे काम सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. हा पार्क देशात अग्रगण्य उत्पादनांची निर्मिती करेल आणि कंपनीचा कायापालट करेल. पॉल फांग म्हणाले, आमच्या जागतिक वाढ धोरणात भारत हा महत्वाचा भाग आहे. भविष्यकाळात भारत आमचे महत्त्वाचे उत्पादन केंद्र असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)