शिक्षकांना मार्चपर्यंत ऑफलाईन वेतन

सुनिल गाडगे : आमदार कपिल पाटील यांच्या प्रयत्नांना यश

नगर – शालार्थ प्रणालीतील बिघाड दूर न झाल्यामुळे, राज्यातील शिक्षकांचे वेतन मार्च 2019 पर्यंत ऑफलाइृन काढण्याचा महत्वपूर्ण निणृय राज्य सरकारने घेतला आहे. शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांच्या ऑफलाईन वेतनाच्या प्रयत्नांना यश आल्यामुळे राज्यातील हजारो शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. अशी माहीती शिक्षक भारतीचे नेते सुनिल गाडगे यांनी दिली.

शिक्षकांचे वेतन होणार्या शालार्थ प्रणालीतील तांत्रिक बिघाडामुळे राज्य सरकारने जुलै 2018 पर्यंत ऑफलाईन पगाराला परवानगी दिली होती. मात्र, जुलै संपल्यानंतरही शालार्थ प्रणालीतील बिघाड दूर झालेला नाही. त्यामुळे शिक्षकांच्या ऑगस्टच्या पगाराबाबत अनिश्‍चितता निर्माण झाली होती. त्यामुळे राज्यभरातील शिक्षकांमध्ये अस्वस्थता होती. या प्रकाराची तातडीने शिक्षक भारतीने दखल घेतली.

त्यानंतर शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील, शिक्षक नेते सुनिल गाडगे, कार्याध्यक्ष आप्पासाहेब जगताप, महानगरचे जिल्हाध्यक्ष प्रदिप रुपटक्के, महानगर महिला जिल्हाध्यक्ष माधवी भालेराव, हनुमंत रायकर, सुदाम दिघे, विजय लंके, सुनिल जाधव, शरद धोत्रे,जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लोंढे, जिल्हा सचिव मोहम्मद समी शेख, संभाजी चौधरी, उच्च माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु, जिल्हा सचिव महेश पाडेकर, कार्याध्यक्ष किशोर डोंगरे, ग्रंथपाल संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास गाडगे,जिल्हा महिला अध्यक्षा आशा मगर, कार्याध्यक्ष मिनाक्षी सुर्यवंशी, आदींनी मंत्रालयात भेट घेवुन शिक्षकांच्या पगारासंदर्भात चर्चा केली.

ऑफलाईन पगार करण्याची विनंती केली. ती तात्काळ मान्य करत मार्च 2019 पर्यंत ऑफलाईन वेतनाला मुदत वाढ दिली. तसेच राज्य सरकारने मार्चपर्यंत ऑफलाईन वेतन काढण्याचा आदेश जारी केला आहे. या निर्णयामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला आहे, असे सुनिल गाडगे म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)