शॉटसर्किटमुळे पाच एकर ऊस जळून खाक

संग्रहित छायाचित्र

श्रीगोंदा- तालुक्‍यातील आढळगाव येथील दादा शंकर गव्हाणे यांचा बुधवारी दुपारी विजेच्या तारांचे शॉर्टसर्किट झाल्याने पाच एकर क्षेत्रातील उस जळून खाक झाला. तांदळी दुमाला शिवारात दादा गव्हाणे यांच्या मालकीचा उस आहे. या क्षेत्रातुन महावितरण कंपनीची वाहिनी जाते.

आज दुपारी साडेतीनच्या सुमारास तारांचे घर्षण होऊन विजेचे गोळे उसाच्या क्षेत्रात पडले. क्षणात आगीने रौद्र रूप धारण केले. आजुबाजुच्या शेतकऱ्यांनी पेटलेला ऊस विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्‍यात आली. ही आग विझविण्यासाठी नानासाहेब गव्हाणे, शैलेश गव्हाने, बाबा गव्हाने, बाळासाहेब गव्हाणे, यांच्यासह आजुबाजुच्या शेतकऱ्यांनी प्रयत्न केले.

-Ads-

दरम्यान या ठिकाणी गेल्या आठवडाभरापासून या ठिकाणी आगीचे गोळे पडत होते. याबाबत विज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली होती, मात्र त्याची वेळीच दखल घेतली न गेल्याने ही दुर्घटना घडली. त्यावेळी आजुबाजुला शेतकरी होते. वेळीच आग आटोक्‍यात आल्याने बाजूला असणारा पन्नास एकर उस वाचू शकला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)