दिव्यांग विद्यार्थ्यांनी बनविले ‘इको फ्रेंडली गणपती’

नगर  – येथील कलाजगत संस्थेने नुकतीच इको फ्रेंडली गणपती बनविणे कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेतील सावेडीतील अपंग संजीवनी सोसायटीच्या मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी मुलांनी मातीपासून इको फ्रेंडली गणपती साकारले. त्या माध्यमातून अशा मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळाला.

या माध्यमातून शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी समाजापासून काहीसे वंचित असलेल्या मुलांना एक हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले. अपंग, कर्णबधीर मुलांच्या अंगी सर्वसामान्य मुलांपेक्षाही चांगले गुण असतात. फक्त त्यांना प्रोत्साहन मिळायला पाहिजे. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून मुलांच्या कलागुणांना वाव मिळाला असून, या माध्यमातून एक मोठा कलाकार भविष्यात होऊ शकतो, असे मत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विद्या भावले यांनी व्यक्त करून कलाजगत या संस्थेचे आभार मानले.

आम्ही मुलांना मातीपासून इको फ्रेंडली बनवायला शिकविणाऱ्याबरोबर त्यांची मातीची असलेली भीती प्रथमत दूर करतो. या मातीला विविध आकार देऊन त्याच्याशी खेळायला लावतो. मातीची भीती एकदा गेली की, या मातीला आकार देण्याचे शिकवितो. सामान्य मुलांप्रमाणे या मुलांनीही या कार्यशाळेस चांगला प्रतिसाद देत आकर्षक गणेशमूर्ती साकारल्या. अनेक ठिकाणी आपण इको फ्रेंडली गणपती बनविण्याच्या कार्यशाळा घेतल्या. मात्र, या मुलांसमवेतचा अनुभव अधिक आनंद देणारा होता, असे शिल्पकार प्रमोद कांबळे म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)