थकीत बिलांसाठी ‘एमईएस’च्या ठेकेदारांची निदर्शने

नगर – भिंगार रोड गॅंरीसन इंजिनीअरिंग अहमदनगर कार्यालय येथे एम.ई.एस. बिल्डर्स असोसीएशन इंडिया नाशिक विभागाच्या अहमदनगर शाखेमधील सर्व ठेकेदारांनी थकीत बिलांच्या मागणीची पूर्तता न झाल्याने बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले.

यावेळी उपाध्यक्ष प्रमोद भालवनकर, सहसचिव एम.डी.ओटी, रमेश कोल्हे, हरीश सूद, मणिलाल पटेल, अंजुम शेख, मेअर पठान, हबीब पठान, बशीर खान, जवाहर मुथा, विकास जगताप, सुधीर मोटा, रियाज सालुजी, हुजेपा सालुजी, श्रीकांत सोमाणी, प्रदीप ठुबे, कुर्बान शेख, खलील सय्यद, मोहन भुजबळ, राम जरांगे आदी सहभागी झाले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एम.ई.एस.विभागामध्ये आजपर्यंत देशभरात 2200 कोटींची व एस.कमांड पुणे यांच्याकडे 500 कोटींची ठेकेदारांची थकीत बिले आहेत. तर नगरमध्ये जवळपास 15 कोटीची बिले गेल्या चार महिन्यापासून थकीत आहेत. यासाठी सर्व ठेकेदारांनी संपाची नोटीस दिल्यानंतर 31 ऑक्‍टोबरपर्यंत बिले देण्याचे कबूल करण्यात आले होते.

आजपर्यंत बिले न मिळाल्याने एम.ई.एस. बिल्डर्स असोसीएशन इंडिया नाशिक विभागाच्या नगरमधील सर्व ठेकेदारांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले आहे. भिंगार रोडवरील किल्ल्यासमोरील एम.ई.एस. कार्यालयासमोर ठेकेदार व कामगारांनी निदर्शने केली व गॅंरीसन इंजिनीअरिंग दक्षिण विभागाचे अधिकारी दीपक ठाकूर व उत्तर विभाग पारस महेश्वरी यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.

माहे जुलै पासून बिले थकल्याने ठेकेदारांनाही मजुरी देताना व सप्लायर्स यांना देणी देणे शक्‍य होत नाही. दिवाळीमध्ये त्यामुळे अनेकांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यावर तत्काळ तोडगा काढावा यासाठी आंदोलनाशिवाय पर्यायच उरला नाही. एम.ई.एस.मध्ये बजेटशिवाय कोणतेही काम काढले जात नसतानाही, अशी परिस्थिती का निर्माण झाली याचा विचार होणे गरजेचे आहे. आजपर्यंतचे पेमेंट त्वरित व्हावे तरच काम बंद आंदोलन मागे घेतले जाईल असे असोसीएशनचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)