बसस्थानकांतील प्रसाधनगृहांत महिलांची लूट

मोफत सुविधा असतानाही पैशांची आकारणी

नगर – एसटी महामंडळाच्या बसस्थानकातील प्रसाधनगृहांत महिलांची आर्थिक लूट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रसाधनगृहांत लघुशंकेची सुविधा मोफत असताना बसस्थानकांत महिलांकडून पैशांची आकारणी केली जात असल्याचे उघडकीस आले.

-Ads-

एसटी महामंडळातर्फे बसस्थानकांतील प्रसाधनगृहांत लघुशंकेसाठी मोफत सुविधा दिली जाते; परंतु बसस्थानकांमध्ये महिलांची अडवणूक करून जबरदस्तीने पैसे आकारले जातात. बस पकडण्याची घाई आणि माहितीचा अभाव, यामुळे पैसे देण्याशिवाय महिला प्रवाशांसमोर पर्याय नसतो. काही प्रवाशांमुळे हा प्रकार अधिकाऱ्यांपर्यंत जातो; परंतु प्रत्यक्षात काहीही कारवाई होत नाही. याचाच फायदा घेत प्रसाधनगृहचालक महिनो-महिने पैशांची कमाई करीत आहेत.

यासंदर्भात एसटी महामंडळातील वरिष्ठ सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्यांपर्यंत तक्रारी पोहोचल्या होत्या. त्यामुळे सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्यांनी राज्यभरातील बसस्थानकांतील प्रसाधनगृहांमध्ये अचानक तपासणी केली. तेव्हा प्रसाधनगृहातील अनेक गैरप्रकार उघडे पडले.

दक्षता सुरक्षा अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत राज्यातील कोकण, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्रातील नगरसह राज्यात 51 ठिकाणच्या प्रसाधानगृहांत महिलांकडून 2 रुपयांपेक्षा जास्त रुपयांची आकारणी केली जात असल्याचे आढळून आले. 223 ठिकाणी महिलांच्या प्रसाधनगृहात महिला कर्मचाऱ्यांची नेमणूकच केलेली नसल्याचाही गंभीर प्रकार समोर आला. या प्रकाराची एसटी महामंडळाने गांभीर्याने नोंद घेत विभाग नियंत्रकांना एका पत्राद्वारे सूचना केल्या आहेत.

प्रसाधनगृहाच्या दर्शनी भागात लघुशंकेच्या मोफत सुविधेसह शौचालय, स्नानगृह वापरण्याच्या दरासंदर्भात फलक लावण्यात यावा. महिलांकडून पैसे घेण्यात आल्याची तक्रार सिद्ध झाल्यास कंत्राटदारावर कारवाई करण्याची सूचना करण्यात आली आहे. महिला प्रसाधनगृह वापर मोफत असल्याने स्वच्छता राखली जात नसल्याचे समोर आले. त्यामुळे महिला प्रसाधनगृहातील स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, अशी सक्त सूचना करण्यात आली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
2 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)