पारनेर-दहिगाव-ने मुक्कामी बस बंदच..

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : नागरीक आंदोलनाच्या पवित्र्यात

भाविनिमगाव – पारनेर आगाराची दहिगाव-ने मुक्कामी येणाऱी एस टी बस गेल्या पाच वर्षांपासून बंद असल्याने परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या भागातील नागरीक आता आंदोलनाच्या पावित्र्यात दिसत आहेत. परिसरातील 9 गावातील ग्रामपंचायतीने तसे ठराव पत्र दिले असून प्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

शहरटाकळी येथील सामाजिक कार्यकर्ते भागचंद कुंडकर यांनी पुढाकार घेऊन जिल्हा वाहतूक नियंत्रण प्रमुख यांना तसे लेखी निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की नगर जिल्ह्याच्या एका टोकाला असलेले शेवगाव तालुक्‍यातील दहिगाव ने हे जिल्हयापासून सुमारे 90 किमी अंतरावर आहे. 1976 साली पारनेर आगाराने दहिगाव ने मुक्कामी एस टी बस सुरु केली. 1976 ते 2014 अशी 39 वर्षे अविरत प्रवासी सेवा या बसने देऊन सकाळी जिल्हाच्या ठिकाणी जाण्यासाठी व राञी घरी येण्यास खात्रीशीर व हक्काची म्हणून या बसने आपली ओळख निर्माण केली होती. मात्र काही कारणास्तव गेल्या पाच वर्षांपासून ही बस बंद आहे. ती परत सुरु करण्यासाठी कुठल्याही लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले नाही.

मध्यंतरी तीन वर्षे नेवासा आगाराने नगर दहिगाव ने ही मुक्कामी बस सुरु करून नागरिकांना मोठा दिलासा दिला. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून या बसला राजकीय ग्रहण लागले व नेवासे तालुका आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी तालुक्‍यातील गाव तेथे एस.टी बस या उपक्रमात केवळ सुकळी या एका गावाच्या प्रवाशांच्या सोयीसाठी या बसचा मार्ग बदलला व शेवगाव तालुक्‍यातील भायगाव भातकुडगाव, बक्तरपूर, देवटाकळी, मजलेशहर, ढोरसडे, आंत्रे, शहरटाकळी व भाविनिमगाव या मोठया लोकसंख्या असलेल्या गावातील प्रवाशांची गैरसोय झाली.

शेवगाव तालुक्‍याच्या आमदार मोनिका राजळे यांनी मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने परिसरातील शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या मुलांची व जिल्हा ठिकाणी जाण्यासाठी नागरिकाची मोठी हेळसांड होते आहे. 9 ग्रामपंचायतने बस पुर्ववत सुरू होण्यासाठी ठराव पत्रे दिली आहेत. त्यावर भायगावचे सरपंच हरीभाऊ दुकळे, भातकुडगावचे सरपंच सर्जेराव नजन, बक्तरपूर सरपंच मंदाकिनी बेडके, देवटाकळीच्या सरपंच अनिता खरड, मजलेशहरचे सरपंच रविंद्र लोढे, ढोरसडे – आंत्रे ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच सुभाष वाघमारे, शहरटाकळी सरपंच अलकाबाई शिंदे व भाविनिमगाव सरपंच पांडुरंग मरकड यांच्या सह्या आहेत.

शेवगाव आगारानेही केल्या दोन बस बंद

सकाळी 9 वाजता दहिगाव ने येथे येणारी व पिंप्री शहाली मुक्कामी जाणारी अशा दोन बस शेवगाव आगाराने बंद केल्या आहेत. यामुळे परिसरातील दहिगाव ने येथील घुले महाविद्यालयात व शहरटाकळी येथील काकडे विद्यालयात तर तालुक्‍यातील शाळेत शालेय विद्यार्थ्यांना जाण्यायेण्यास मोठी अडचण निर्माण झाल्याने मुलांना व नागरिकांना जास्तीचा वेळ व पैसा खर्च करूनही गैरसोय होत आहे. याबाबत सभापती क्षितीज घुले यांनी पाठपुरावा करूनही आगार व्यवस्थापक दुर्लक्ष करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)