स्वातंत्र्यदिनी प्रवासी सेवेकऱ्यांचा सन्मान

file photo

विना अपघात सेवा दिल्याबद्दल रापमंकडून प्रोत्साहनपर बक्षीस

नगर – प्रवासी जनतेची सुरक्षित वाहतूक व्हावी, चालकांनी विना अपघात सेवा करावी, या करिता राज्य परिवहन महामंडळाने प्रोत्साहनपर बक्षीस योजना सुरू केलेली आहे. या योजनेस चालकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. नगर विभागातील 200 चालक पात्र ठरले असून, बक्षिसांचे वाटप येत्या स्वातंत्र्यदिनी अर्थात 15 ऑगस्ट रोजी चालक काम करीत असलेल्या आगारात करण्यात येणार आहे.

-Ads-

नगर विभागांतर्गत रापमंचे चालक बारा महिन्यांमध्ये 260 दिवस विना अपघात सेवा बजावतात. अशा चालकांना रूपये एक हजार व बारा महिन्यांपेक्षा जास्त दिवसांत विना अपघात सेवा करणाऱ्या चालकांना सहाशे रूपये रोख बक्षीस देण्याची योजना अंमलात आहे. नगर विभागात एकूण 284 चालकांनी अपघात विरहित सेवा केलेली असून, पैकी 200 चालक एक हजार रूपये बक्षीस योजनेस पात्र असून, 84 चालक सहाशे रूपये रोख बक्षीस रकमेस पात्र ठरले आहे.

नगर विभागात एकूण रूपये दोन लाख 50 हजार 400 रूपये इतक्‍या बक्षीस रकमेचे वाटप 15 ऑगस्ट रोजी कार्यक्रमाच्यावेळी संबंधित चालकांना ते काम करीत असलेल्या आगारात देण्यात येणार आहे. सर्व बक्षीस पात्र चालकांचे अभिनंदन विभाग नियंत्रक विजय गिते यांनी केले असून, विभागातील सर्व चालकांनी प्रवाशी जनतेस दर्जेदार अपघात विरहित सेवा देण्याविषयी आवाहन केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)