आगारात रुतलेले चाक अखेर रस्त्यावर

file photo

एसटी बससेवा पुन्हा सुरळीत : प्रवाशांनी सोडला सुटकेचा श्‍वास

नगर – सकल मराठा समाजाने आरक्षणासह इतर मागण्यांसाठी संपाची हाक दिली होती. मोर्चे, आंदोलन, संप या काळात वारंवार एसटीला टार्गेट केले जाते. त्यामुळे एसटीचे प्रचंड नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी एसटी प्रशासनाने संपाच्या पार्श्‍वभूमीवर प्रवासी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यात क्रांतिदिनी झालेल्या आंदोलनामुळे सुमारे 70 ते 80 लाख रुपयांची झळ एसटी प्रशासनाला सोसावी लागली. परंतु, एक दिवसाच्या संपानंतर आजअखेर आगारात रुतलेले एसटी चाक रस्त्यावर आले आल्याने प्रवाशांनीही सुटकेचा श्‍वास सोडला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सकल मराठा समाजाने आरक्षणाचा एल्गार पुकारत महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. संपाच्या पार्श्‍वभूमीवर एसटी महामंडळाने काल जिल्ह्यातील अकरा आगारातील 750 बसेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. एसटी महामंडळाच्या 750 बसेस दोन हजार फेऱ्या पूर्ण करतात. यातून एसटी प्रशासनाला 70 ते 80 लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त होते. या सर्व नफ्यावर एसटी महामंडळाने पाणी सोडत एसटी सेवा बंद करण्यात आली होती. आगारात एसटी बसेस ठप्प झाल्या होत्या. एसटी महामंडळाकडून बसस्थानकातही एकही प्रवासी राहणार नाही, याची दक्षता घेतलेली दिसून आली होती. मात्र, एक दिवसाच्या संपानंतर आज अखेर प्रवासी सेवा सुरळीत करण्यात आली.

सकल मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर क्रांतिदिनी जिल्ह्यातील बससेवा पूर्णतः बंद झाली होती. जिल्ह्यात अकरा आगार असून, 750 बसेस प्रवाशांच्या दिमतीला रात्रंदिवस धावत असतात. एसटीच्या दोन हजार फेऱ्या होतात. या सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र, आजपासून सकाळी एसटीची बससेवा पुन्हा सुरळीत करण्यात आली.
विजय गिते ,विभाग नियंत्रक

दोन हजार फेऱ्या बुडाल्या

सकल मराठा समाजाच्या संपाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील 750 बसेसच्या 2 हजार फेऱ्या एसटी प्रशासनाने रद्द केल्या होत्या. यामधून परिवहन मंडळाला अंदाजे 70 ते 80 लाखाचे उत्पन्न बुडाले आहे. परंतु, क्रांतिदिनाच्या दुसऱ्या दिवशी एसटीची सेवा सुरळीत करण्यात आल्याने प्रवाशांनीही सुटकेचा श्‍वास सोडला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)