बस खांबाला धडकल्याने दोन प्रवासी जखमी

श्रीगोंदे – एसटी बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती खांबावर जाऊन धडकली. त्यात दोन प्रवासी जखमी झाले. हा अपघात श्रीगोंदे-आढळगाव रस्त्यावर गुरुवारी (दि. 29) सकाळी झाला.

अपघातात नगरपरिषदेचा नवीन विद्युत खांब जमीनदोस्त झाला आहे. बसचेही नुकसान झाले आहे. बस (क्र. एमएच-40 एन 8845) आढळगावहून श्रीगोंद्याकडे येत असताना ती खड्ड्यात आदळली. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस खांबाला धडकली.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)