राहुरी : राहुरी येथील लोकनेते रामदास पाटील धुमाळ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक नितीन मार्तंड वाळुंज यांनी नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे अंतर्गत चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय,
पुणे येथून शारीरिक शिक्षण विषयाअंतर्गत Effectiveness of PETE Program and Preparedness of Pre-Service PE Teachers through Photovoice या विषयावर संशोधन कार्य पूर्ण केले आहे. त्यांना संशोधन मार्गदर्शक म्हणून डॉ. श्रद्धा नाईक, आगाशे महाविद्यालय, पुणे यांनी मार्गदर्शन केले.
संशोधन मुलाखती दरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. डॉ. दीपक माने यांनी अध्यक्ष म्हणून तसेच संशोधन मुलाखत बहिस्थ परिक्षक म्हणून डॉ. रिना पूनिया यांनी काम पाहिले. पी.एच.डी पूर्ण केल्याबद्दल त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले..