जागतिक पॅरामोटर स्पर्धेत आप्पासाहेब ढुस यांचा विक्रम

एक सुवर्ण ,एक रजत ,दोन कांस्य  : चार राष्ट्रीय विक्रम ,तीन जीवन गौरव पुरस्कार

नगर – जागतिक स्पर्धेत मर्यादित इंधनाचा वापर करून हवेतून सर्वात जास्त अंतर पार करणारे ढुस हे प्रथम भारतीय ठरले आहेत. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने ढुस यांच्या या विक्रमाची दखल घेतली असून ते चौथ्या राष्ट्रीय विक्रमाचे व तिसऱ्या लाईफ टाइम ऍचिवमेंटचे मानकरी ठरले आहेत, त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याच्या व महाराष्ट्र राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्‍यातील देवळाली प्रवरा गावचे सुपुत्र असलेल्या आप्पासाहेब भिमराज ढुस या साहसवीराने थायलंड येथे 30 एप्रिल ते 6 मे 2018 या कालावधीत पार पडलेल्या वल्ड पॅरामोटर चॅम्पियनशीप स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करताना पी.एल. वन कॅटेगरी व ईकॉनॉमी अँड डिस्टन्स टास्क प्रकारामध्ये मर्यादित इंधनाचा वापर करून हवेमध्ये 34 किलोमीटर अंतर पार करणारा प्रथम भारतीय होण्याचा बहुमान प्राप्त केला आहे.

आप्पासाहेब ढुस यांच्या नावे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्‌स मध्ये या पूर्वी तीन राष्ट्रीय विक्रम नोंदविले गेले असून.. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ने ढुस यांच्या या चौथ्या विक्रमाची नोंद घेतली असून त्यांना तसे प्रमाणपत्र व पदक देऊन लवरकरच मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे.

आप्पासाहेब ढुस यांच्या नावे सन 2009 मध्ये 12 हजार फुट उंच विमानातून 12 वेळेस उडी मारण्याचा पहीला राष्ट्रीय विक्रम नोंदविला गेला असून सन 2016 मधील पॅरामोटर क्रीड़ा प्रकाराच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एक रजत व दोन कास्य पदके जिंकून देशाला पहिले आंतरराष्ट्रीय पदक जिंकून देणारा खेळाडू ठरल्याबद्दल ढुस यांच्या नावे दुसरा राष्ट्रीय विक्रम नोंदविला गेला.

तसेच सन 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देश्‍याला सुवर्णपदक जिंकून देणारा प्रथम भारतीय सुवर्णपदक विजेता आंतरराष्ट्रीय खेळाडू होण्याचा बहुमान प्राप्त करून त्यांनी तिसरा विक्रम नोंदविला. व आता पॅरामोटर च्या साहाय्याने जागतिक स्पर्धेत मर्यादित इंधनात हवेतून 34 किलोमीटर अंतर पार करणारा प्रथम भारतीय होण्याचा बहुमान प्राप्त करून चौथ्या विक्रमाला ढुस यांनी गवसणी घातली आहे.

अशा पध्दतीने ढुस यांनी पॅरामोटोर या हवेतील साहसी क्रीडा प्रकारात चार राष्ट्रीय विक्रम नोंदवून आंतरराष्ट्रीय पातळीवर या क्रीडा प्रकारात देशाला नवीन ओळख निर्माण करून दिली आहे.

हवेतील साहसी क्रीड़ा प्रकाराच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ढुस यांनी देशाला आत्तापर्यंत एक सुवर्ण, एक रजत व दोन कास्य पदके जिंकून दिली असून . आत्तापर्यंत तब्बल चार राष्ट्रीय विक्रमांचे ते मानकरी ठरले आहेत ,तसेच तीन लाईफ टाईम अचिवमेंटही त्यांना प्राप्त झाल्या असून महाराष्ट्र शासनाने सन 2011-12 चा राज्यातील सर्वोच्च साहसी खेळाडू म्हणून शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार देवून त्यांना सन्मानित केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)