कोमल तनपुरेला बॉक्‍सिंगमध्ये सुवर्णपदक

संगमनेर – हरियाणा येथे झालेल्या सीबीएसई राष्ट्रीय बॉक्‍सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलच्या कोमल तनपुरेने सुवर्णपदक प्राप्त केले आहे. स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर तिला गेम फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय स्पर्धेसह खेलो इंडिया या केंद्र सरकारच्या स्पर्धेत थेट प्रवेश मिळविला आहे.

हरियाणातील महिंद्रगड येथे सीबीएसई शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी झालेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातून आठशे बॉक्‍सिंगपटू सहभागी झाले होते. यापूर्वी झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतील चमकदार कामगिरीच्या बळावर ध्रुव ग्लोबल स्कूलच्या कोमल तनपुरे व श्रुती प्रवीण भंडारी या दोघींची या स्पर्धेसाठी निवड झाली होती. या स्पर्धेत 57 ते 60 किलो वजन गटात मुष्टीयुद्धाचे विविध डावपेच वापरताना कोमल तनपुरेने सुरुवातीपासूनच वर्चस्व मिळविले.

अंतिम सामन्यात प्रतिस्पर्ध्यावर जलद आक्रमण करीत त्याला बचावात्मक भूमिकेत टाकणाऱ्या कोमलने मोक्‍याच्यावेळी विजयी पंच लगावत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. अमोल वामन यांचे कोमलला मार्गदर्शन लाभले. कोमलचे ध्रुव ग्लोबल स्कूलचे अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, उपाध्यक्ष गिरीश मालपाणी, प्राचार्या अर्चना घोरपडे व क्रीडा विभागाचे प्रमुख गिरीश टोकसे यांनी अभिनंदन केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)