कुस्ती स्पर्धेत गोल्हार अव्वल ;जिल्हास्तरीय कुस्तीसाठी निवड

पाथर्डी – तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत जवळवाडी येथील जालिंदरनाथ माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी बाळासाहेब गोल्हार याने तालुक्‍यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तालुकास्तरीय स्पर्धा जिंकल्यानंतर गोल्हार याची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

इतर वयोगटातही विद्यालयातील खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करत द्वितीय क्रमांक मिळविला. शहरातील बाबूजी आव्हाड महाविद्यालयाच्या प्रांगणात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात तालुक्‍यातील 35 विद्यालयांचा सहभाग होता. यामध्ये 55 किलो वयोगटात खेळून गोल्हार याने प्रथम क्रमांक मिळविला.

-Ads-

यासह किरण शिंगटे 71 किलो वजन गटात द्वितीय, लखन ढाकणे 60 किलो वजन गटात द्वितीय, कल्पना घुगे 39 वजन गटात द्वितीय, अस्मिता शेलार 36 किलो वजन गटात द्वीतीय असे यश संपादित केले.

यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे सचिव तथा मुख्याध्यापक मिथून डोंगरे यांनी अभिनंदन केले आहे. क्रीडाशिक्षक अविनाश घुगे यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले. पालकवर्गाकडून त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे. सविता डोंगरे, अनिशा शेख यांचेही मार्गदर्शन लाभले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)