‘गौतम’च्या खेळाडूंची राज्य हॉकी संघात निवड

कोपरगाव – नाशिक जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे आयोजित राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचालित गौतम पब्लिक स्कूलच्या 14 वर्षांखालील हॉकी संघाने पुणे विभागाचे नेतृत्व केले. यावेळी दाखविलेल्या चमकदार खेळीमुळे या विद्यार्थ्यांची राज्य हॉकी संघात निवड झाली आहे.

उपांत्यपूर्व सामना गौतम स्कूल व नाशिकच्या संघात झाला. यावेळी गौतमच्या संघाने नाशिक संघाचा 2-0 असा पराभव केला. उपांत्य सामन्यात बलाढ्य मुंबईच्या संघाचा 2-0 असा दणदणीत पराभव केला. अंतिम सामन्यात गौतमच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. सामन्याचा निकाल पेनल्टी स्ट्रोकवर गेला. सडन डेथमध्ये कोल्हापूर संघाकडून 1-0 असा निसटता पराभव झाल्याने गौतमचा संघ उपविजेता ठरला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केलेल्या गौतमच्या कार्तिक पटारे यास मालिकावीर, तसेच सुशांत बेडसे यास सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गौतमच्या कार्तिक पटारे, हर्ष काकडे (नाशिक ), रितेश पोळ (औरंगाबाद) व सुशांत बेडसे (नाशिक) या खेळाडूंची राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या शालेय हॉकी स्पर्धेत राज्याच्या संघात निवड झाली आहे. ही स्पर्धा हरियाना येथे होणार असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी दिली.

खेळाडूंना क्रीडा संचालक सुधाकर निलक, हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे, कपिल वाघ यांचे मार्गदर्शन लाभले. संघास संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अशोकरावजी काळे, उपाध्यक्ष छबूराव आव्हाड, विश्‍वस्त युवा नेते आशुतोष काळे, सचिव चैतालीताई काळे, सहसचिव स्नेहलताई शिंदे यांनी पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)