राष्ट्रीय एरोबिक्‍स स्पर्धेत ‘ध्रुव स्कूल’चे यश

संगमनेर – गोव्यात पार पडलेल्या राष्ट्रीय एरोबिक्‍स चॅम्पियनशीप स्पर्धेत संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले. ट्रायो प्रकारात खेळाडूंनी सहा सुवर्ण, तर वैयक्तिक प्रकारात दोन सुवर्णपदकांसह एक रौप्य व दोन कांस्यपदके पटकाविली. देशभरातून 22 राज्यांतील एक हजार खेळाडू सहभागी झाले होते.

10 वर्षांखालील मुलांच्या स्पर्धेत ट्रायो प्रकारात ध्रुवचे अमित हरिभाऊ नागरे, अथर्व अशोक सांगळे, ध्रुव शिवाजी पानसरे यांनी, तर 14 वर्षांखालील गटात प्रेम सुनील पानसरे, वरद लक्ष्मण गाडेकर व विश्‍वतेज बबलू गुडेप यांनी सुवर्ण पदकांची कमाई केली. वैयक्तिक स्पोर्टस्‌ एरोबिक प्रकारात अरिहंत अनिल मुथा व प्रेम सुनील पानसरे यांनी सुवर्ण, सम्राट कैलास अडांगळे यांनी रौप्य, तर विराग महेंद्र सातपुते व अंशूल संतोष दर्डा यांनी कांस्यपदके मिळविली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या स्पर्धेत ध्रुवच्या विद्यार्थ्यांनी आठ सुवर्ण, एक रौप्य व दोन कांस्यपदकांसह एकूण 11 पदके पटकाविली. गोव्याचे क्रीडामंत्री बाबू आजगावकर, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे विश्‍वस्त आनंदेश्‍वर पांडे, क्रीडा संचालक व्ही. एन. प्रभू आदी मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. कुलदीप कागडे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)