जिल्हास्तरीय स्पर्धेत ‘रेसिडेन्सिअल’ हायस्कूलची बाजी

शेवगाव – क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी, जिल्हा क्रीडा परिषद तसेच रेसिडेन्सिअल हायस्कूल शेवगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धा रेसिडेन्सिअल हायस्कूलच्या मैदानावर पार पाडली. त्यात रेसिडेन्सिअल हायस्कूलच्या संघाने बाजी मारली.

स्पर्धेत 14 तालुक्‍यातील संघ सहभागी झाले होते. त्यात रेसिडेन्शिअल हायस्कूलचा 17 वर्षे मुलांचा अंतिम सामना नेवासे विरुद्ध झाला. त्यात रेसिडेन्सिअल हायस्कूलचा संघ आठ गुणांनी विजयी झाला. या सामन्यात हृषिकेश चेमटे, नरेंद्र कातकडे, कुणाल होडशीळ, मयूर गायकवाड यांनी प्रतिस्पर्धी संघाशी चांगली झूंज देवून विजय मिळवून दिला. दि. 6 ऑक्‍टोबर रोजी सुरु होण्याऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. रेसिडेन्सिअल हायस्कूलच्या खेळाडूंनी अनेक वर्षांची यशाची परंपरा कायम राखली.

-Ads-

विद्यालयाचे प्राचार्य दिलीप फलके, पर्यवेक्षक बाबासाहेब मोटे यांचे मार्गदर्शनाखाली क्रीडाशिक्षक बबन गायकवाड, संजय दळवी तसेच शेवगाव स्पोर्ट क्‍लबचे निलेश झिरपे, डॉ. किरण वाघ, सचिन वाल्हेकर, रमेश लव्हाट यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थाचालकांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)