43 वर्षांनी पुन्हा भरला वर्ग 

1975 च्या वर्गमित्रांचा स्नेहमेळाव्यात आठवणींना उजाळा

बालाजी देडगाव – नेवासा तालुक्‍यातील बालाजी देडगाव येथे 1975 च्या वर्गमित्रांनी 43 वर्षानंतर एकत्र येत स्नेहमेळाव्यातून आपल्या आठवणींना उजाळा दिला. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 1975 च्या वर्गमित्रांनी पुन्हा वर्ग भरवत आपले शालेय जीवन अनुभवले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत पुंड होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके व प्रगतशील शेतकरी चंद्रभान कदम यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या सोहळ्यात या वर्गमित्रांचे शिक्षक लक्ष्मण वांढेकर ( गुरुजी ) यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी ज्या मित्रांनी जगाचा निरोप घेतला आहे, त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी बन्सीभाऊ एडके, चंद्रभान कदम, रघुनाथ कुटे, दादासाहेब वाहुरवाघ, राजाराम मुंगसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या सोहळ्यासाठी माजी सरपंच दत्ता मुंगसे, बालाजी देवस्थानचे सचिव रामानंद मुंगसे, कोतवाल अविनाश हिवाळे, शाळा व्यवस्थापनचे माजी अध्यक्ष किशोर मुंगसे, अध्यक्ष राजेंद्र ससाणे, कृष्णा महाराज शिरसाठ, फकीरचंद हिवाळे, बंडू वांढेकर, विलास मुंगसे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी संभाजी कदम, चांगदेव तांबे, शिवाजी तांबे, आण्णा फुलारी, गंगाधर मुंगसे, अशोक औटी, रामदास एडके, कानिफनाथ वांढेकर आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी पुढील वर्षाच्या स्नेहमेळाव्याच्या अध्यक्षस्थानी चंद्रभान कदम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. मुख्याध्यापक सुर्यकांत कदम यांनी सुत्रसंचालन केले. तर संजयकुमार लाड यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)