मोक्काअंतर्गत फरार गुन्हेगार गावठी पिस्तूलासह ताब्यात

श्रीरामपूर – शहर पोलिसांची फरार आरोपींची शोध मोहीम सुरु असतांना गुप्त माहितीनुसार निपाणी वाडगांव येथे फरार आरोपीला पाठलाग करुन रंगेहाथ पकडले. विविध गुन्ह्यात फरार असलेला सोमनाथ मधुकर चोभे (वय 31) रा. निपाणी वाडगांव, श्रीरामपूर असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.

या आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तुल, जिंवत काडतुस व एक पिकअप गाडी मिळून आले. त्याच्याविरुध्द श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार प्रतीबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या आरोपीवर राहुरी, संगमनेर, तळेगाव दाभाडे, पुणे जिल्ह्यातील सिंहगड, वाकड, सांगवी, पिंपरी, निगडी, पुणे जिल्हा या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)