श्रीगोंदे पोलिसांची कारवाई : तांदळीत टाकणार होते दरोडा

श्रीगोंदे – श्रीगोंदे तालुक्‍यातील टाकळी लोणार येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना पोलिसांनी गजाआड केले आहे. हे तिघे सर्राइत गुन्हेगार असून नगर व बाहेरील जिल्ह्यात यांनी अनेक गुन्हे केल्याचा संशय पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी व्यक्त केला.

सुरेश अशोक खंडागळे (वय 27), भाऊसाहेब बाबुराव साखरे (वय 40), दादा अभिमान पोळके (वय 35) (सर्व रा.राजुरी, ता.करमाळा, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार, सहायक पोलीस निरीक्षक नीलेश कांबळे, अंकुश ढवळे, उत्तम राऊत, दादा टाके, किरण बोराडे, औटी हे टाकळी लोणार परिसरात रात्री गस्त करत होते. टाकळी लोणार येथे एका ओढ्या जवळ, झाडाच्या आडोशाला एक महिंद्रा पिकअप (क्र. एम.एच.04.सी.पी.2435) संशयितरित्या दिसून आले.

गाडीच्या जवळ जाऊन पाहिल्यावर बाहेर उभा असलेले दोन जण आत बसलेल्या तिघांशी बोलत होते. त्यांना नावे विचारले असता बाहेरचे दोघे अंधारात लावलेल्या दुचाकी वरून पळून गेले. गाडीतील व्यक्‍तींची चौकशी करत असताना ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्यांची झडती घेतल्यावर त्यांच्याकडे दरोडा टाकण्याचे साहित्य लोखंडी कटावणी, 10 मी लांबीची नायलॉन दोरी, मिरची पुडी इत्यादी मिळून आले. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता तांदळीत दरोडा टाकण्यासाठी आलो असल्याची कबुली आरोपीनी दिली आहे. त्याच्यावर कलम 399 व 402 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोवार यांनी सांगितले.

मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या टार्गेट…

अटक केलेल्या तिघांची पोवार यांनी कसून चौकशी केली. टेंमभुर्णी, बारामती, विहाळ, जातेगाव, राजूरी, आळसुंदे, खानोर, अकलूज बायपास, भोळेवाडी, उंबरड, शेलगाव, वाशिंबे, टाकळी, कोर्टी अशा वेगवेगळ्या ठिकाणी मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरल्याची कबुली या आरोपींनी दिली आहे. हे आरोपी सर्राइत गुन्हेगार असून आणखी गुन्हे उघड होतात का या दृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)