तहसीलदारांच्या कामकाजाची सीआयडी चौकशी करा

माजी सरपंच वाबळे यांचे जिल्हाधिकऱ्यांना निवेदन : वाळूतस्करांसोबत हवाईसफर

श्रीगोंदे – तहसीलदार वाळूतस्करांसह हवाईसफर करतात. त्यांच्या या वागण्याने त्यांच्यावर विश्‍वास ठेवणे अशक्‍य झाले आहे. तहसीलदार महेंद्र माळी यांच्या कामकाजाची सीआयडी मार्फत चौकशी करून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी म्हातारपिंप्रीचे माजी सरपंच केशवराव वाबळे यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

तहसीलदार माळी हे तालुक्‍यातील सर्वच वाळूतस्करांकडून हफ्ते घेत असल्याचा थेट आरोप वाबळे यांनी या निवेदनात केला आहे. म्हातारपिंप्रीचे माजी सरपंच केशवराव वाबळे यांनी जिल्हाधिकारी द्विवेदी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, म्हातारपिंप्री येथील पाझर तलावातून शेकडो ब्रास मुरूमाचे अवैधरित्या उत्खनन करण्यात आले. जेसीबी, पोकलेन, आणि ट्रॅक्‍टरच्या सहायाने मुरूम काढण्यात येत होता. याबाबत मी 24 ऑगस्ट रोजी आत्मदहनाची नोटीस दिली होती. मात्र या नोटीसला तहसीलदार महेंद्र माळी यांनी कोणतेही उत्तर दिले नाही.

तहसीलदार माळी यांनी शासनाचा जबाबदार अधिकारी म्हणून या प्रकरणी चौकशी करून माझ्या नोटीसला उत्तर देणे क्रमप्राप्त होते. या मुरूम उत्खननात बडे असल्याने तहसीलदार माळी यांना मुरूमाच्या चोरीचा अहवाल मांडता आला नाही.

वाबळे यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे की, एकीकडे मुरूम उत्खनन करणाऱ्यांना मोकळीक दिली जात आहे. तर दुसरीकडे तालुक्‍यातील घोड, भीमा, सीना, हंगा नद्यांसह ओढ्या-नाल्यांतून वाळूउपसा करणाऱ्या तस्करांकडून तहसीलदार माळी महिन्याला हफ्ते घेत असल्याचा थेट आरोप वाबळे यांनी केला आहे. त्यासोबतच जे वाळूतस्कर हफ्ते देत नाहीत, त्यांची तहसील कार्यालयातील अधिकारी अन्‌ कर्मचाऱ्यांकडून इतर कामांत अडवणूक केली जाते, असेही वाबळे यांनी म्हटले आहे.

वाळूतस्करांकडून हफ्ते घेण्याबरोबरच तहसीलदार जमीन कागदपत्रे बदलणे, बेकायदेशीर व्यवहार करून देण्याचे उद्योग करीत असल्याचा आरोप वाबळे यांनी केला आहे, तहसीलदार महेंद्र माळी यांची सीआयडी मार्फत चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)