विविध संघटनांकडून करावाईची मागणी

श्रीगोंदे – तहसीलदार महेंद्र माळी यांनी वाळूतस्करासह हवाईसफर केल्याचे वृत्त “प्रभात’ने प्रसिद्ध केल्याने तालुक्‍यात एकाच खळबळ उडाली. तहसीलदारांच्या या भूमिकेबाबत अनेकांनी “सोशल मीडिया’वर जाहीर नाराजी व्यक्त केली. महसूल प्रशासनाविषयी आलेल्या कटू अनुभवांना नागरिकांनी वाट करून दिली. बुधवारी (दि.5) दिवसभर तालुक्‍यातील विविध शासकीय कार्यालयांसह वाळूठेकेदारांत या बातमीची चर्चा रंगली होती.

तालुक्‍यातील बेसुमार वाळूतस्करी हा विषय सर्वांच्या सवयीचा भाग बनला आहे. वाळूतस्कर अन्‌ महसूल प्रशासनाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे असलेले हितसंबंधदेखील अनेकदा चर्चेत राहिले. वाळूतस्करी रोखण्याची जबाबदारी असणाऱ्या माळी यांनीच मागील पंधरवड्यात वाळूतस्करासह हवाईसफर करून देवदर्शन केल्याची बातमी बुधवारी (दि.5) “प्रभात’मध्ये झळकली.

या बातमीची तालुक्‍यात दिवसभर चर्चा रंगली होती. या बातमीचा आधार घेत अनेकांनी माळी यांच्याकडे वाळूतस्करीविषयी तक्रार केल्यानंतर आलेले निरनिराळे अनुभव “सोशल मीडिया’वर मांडले. वाळूतस्करीविषयी तक्रार करण्यासाठी महसूल विभागाकडे फोन करणाऱ्या व्यक्तीचे नाव वाळूतस्करांपर्यंत जात असल्याचा धक्कादायक अनुभव अनेकांनी सांगितला. उद्या (गुरुवारी) संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस हे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन माळी यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)