शाळा ‘हायटेक’; पण गुणवत्तेचे तीनतेरा

श्रीगोंद्यातील देशमुखवस्ती शाळा सापडली वादाच्या भोवऱ्यात;  मुख्याध्यापकांविरोधात तक्रार

श्रीगोंदा  – तालुक्‍यातील शिरसगाव बोडखा येथील “हायटेक शाळा’ म्हणून नावाजलेल्या देशमुखवस्ती जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता तपासणी करण्याची मागणी पालकांनी व ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यामुळे ही शाळा आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. शाळेची गुणवत्तेचे तीनतेरा वाजले असतांनाही ती हायटेक झाली अशी असा प्रश्‍न यानिमित्ताने पुढे आला आहे. या शाळेचे मुख्याध्यापक रामदास ठाकर हे अध्यापनाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. गुरुवारी पालक व ग्रामस्थ शाळेला कुलूप ठोकणार होते, मात्र गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीमुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले.

शिरसगाव बोडखा येथील देशमुख वस्ती जिल्हा परिषद शाळेबाबत पालक व ग्रामस्थांनी 4 सप्टेंबर रोजी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, देशमुख वस्ती जिल्हा परिषद शाळेसाठी एक वर्गखोली मंजूर होऊन तिचे बांधकाम देखील पूर्ण झाले आहे, मात्र या खोलीत “डिजिटल क्‍लासरूम’ बनविण्यात आल्याने आजही विद्यार्थ्यांना पडक्‍या वर्गखोलीत बसवले जात आहे. विद्यार्थ्यांना नवीन वर्गखोलीत बसविण्यासाठी सांगून देखील त्यांना जुन्या धोकादायक वर्गखोलीत बसविले जात आहे. तसेच मुख्याध्यापक ठाकर यांनी “यूट्यूबवर शाळेला “क’ वर्गातून “अ’ वर्गात आणल्याची खोटी माहिती टाकली आहे. यामुळे देशमुखवस्ती जिल्हा परिषद शाळेची बदनामी झाली आहे.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, मुख्याध्यापक ठाकर हे शाळेत सतत अनुपस्थित असतात; परिणामी अध्यापनाकडे दुर्लक्ष होऊन शाळेतील शिक्षणाची गुणवत्ता ढासळल्याचे या म्हटले आहे. मुख्याध्यापक ठाकर यांच्याविषयी गेल्या पाच वर्षांत “लॉगबुक’मध्ये भरलेली माहिती पालकांना दाखविण्याची मागणी देखील या निवेदनात करण्यात आली आहे. देशमुखवस्ती जिल्हा परिषद शाळेचा शैक्षणिक दर्जा घसरला असल्याने गटशिक्षणाधिकारी, गटविस्ताराधिकारी यांनी गुणवत्ता चाचणी घेण्याची व देशमुखवस्ती शाळेत “सेमी इंग्लिश’ सुरू करण्याची मागणी या निवेदनाद्वारे गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. या निवेदनावर मोहन शिर्के, ज्ञानदेव गवते, बाबासाहेब ढवण, प्रकाश वाबळे, हनुमंत गायकवाड, दिपक चौधरी, श्‍याम काकडे, अमित जाधव आदींच्या सह्या आहेत.

दरम्यान, काल (दि.6) देशमुखवस्ती जिल्हा परिषद शाळेला पालक व ग्रामस्थ टाळे ठोकणार होते, मात्र गटशिक्षणाधिकारी गुलाब सय्यद यांनी पालक व ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र “हायटेक शाळा’ म्हणून नावाजलेल्या देशमुखवस्ती जिल्हा परिषद शाळेतील शैक्षणिक गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)