अमोनियम नायट्रेटचा साठा जप्त 

श्रीगोंदे तालुक्यातील चौघे पोलिसांच्या रडारवर

श्रीगोंदा – स्फोटकांचा साठा असल्याच्या संशयातून रविवारी औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी शहरातील एका खासगी गोदामाची तपासणी केली होती. या गोदामात अमोनियम नायट्रेटचा साठा असल्याच्या चर्चेला पुष्टी मिळत आहे. श्रीगोंदा पोलिसांनी मात्र या प्रकरणाबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगत हात वर केले आहेत. जिल्हा पोलीस प्रशासनाने मात्र या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असल्याचे समजते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत विश्‍वसनीय सूत्रांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, औरंगाबाद पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात जिल्ह्यातील फुलंब्री पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक हजार सातशे किलो अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आले होते. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यातील फूलंब्री पोलीस ठाण्यात भारतीय स्फोटक कायद्यानुसार एक गुन्हा दाखल आहे.

मात्र या प्रकरणाची पाळेमुळे श्रीगोंद्यात आहेत.गेल्या काही वर्षांपासून अमोनियम नायट्रेट वापरण्यावर कायद्याची मोठी बंधने आहेत, मात्र तरीही अमोनियम नायट्रेटची खरेदी-विक्री सुरुच असल्याचे या घटनेने समोर येत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर औरंगाबाद पोलीस रविवारी श्रीगोंदा येथे आले होते.

औरंगाबाद पोलिसांना शहरातील एका गोडावूनमध्ये अमोनियम नायट्रेट आढळून आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजते. या ठिकाणी मराठवाड्यातील एका शहरातून ही बेकायदा स्फोटके येत असल्याचे समोर आले आहे. रविवारी औरंगाबाद पोलिसांनी गोडावूनची पाहणी करन एका आरोपी ताब्यात घेतले.

स्फोटक प्रकरणात तालुक्‍यातील काही लोकांची नावे समोर आली आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून अधिक चौकशी सुरू आहे.
– बाजीराव पोवार, पोलीस निरीक्षक

श्रीगोंद्यातील दोन-तीन जण औरंगाबाद पोलिसांच्या रडारवर आले आहेत. श्रीगोंदा पोलिसांनी मात्र या प्रकरणाबाबत बघ्याची भूमिका घेतली असल्याचेच दिसते. श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या काही अंतरावर हा साठा केला जात असताना श्रीगोंदा पोलिसांच्या गोपनीय शाखेला याबाबत कुठलीच कल्पना नसणे हे त्या यंत्रणेचे अपयश म्हटल्यास वावगे ठरणार नाही. श्रीगोंदा पोलीस या स्फोटक प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत नसले तरी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी यामध्ये स्वतः लक्ष घातले असल्याचे समजते.

या प्रकरणात औरंगाबाद पोलिसांनी तालुक्‍यातील एका संशयिताला ताब्यात घेऊन चौकशीसाठी औरंगाबादला नेले आहे. तर शहरातील एका व्यक्तीला अधिक तपासासाठी औरंगाबाद येथे सोमवारी बोलविण्यात आले होते. स्फोटकांच्या मालकांची नावे समोर आली असून ती राजाश्रय लाभलेली आहेत. ती तालुक्‍यातून फरार झाली आहेत.

औरंगाबाद पोलिसांनी सगळे प्रकरण गांभीर्याने घेतले असून या प्रकरणाची व्याप्ती अधिक वाढण्याची शक्‍यता आहे. या प्रकरणातील संशयितांनी या स्फोटकांची गैरमार्गाने विक्रीकरून कोट्यवधी रुपयांची माया जमविली असल्याची चर्चा असून पोलीस त्यादृष्टीने देखील पोलीस यंत्रणा तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)