साईकृपा, कुकडीपेक्षा जास्त बाजारभाव देऊ – नागवडे

श्रीगोंदे – यावर्षी तालुक्‍यात ऊसक्षेत्र चांगले होते, मात्र हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे कारखान्यांचे गळीत हंगामही अडचणीत सापडले. मात्र नागवडे कारखाना सर्व अडचणींवर मात करून साईकृपा आणि कुकडी कारखान्यापेक्षा दोन रुपये जास्त बाजारभाव देऊ, अशी ग्वाही ‘नागवडे’ कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली.

तालुक्‍यातील म्हातारपिंप्री ग्रामपंचायतीच्या नूतन कार्यालयाचा उद्‌घाटन सोहळा नागवडे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (दि.25) सकाळी पार पडला. यावेळी बोलताना नागवडे म्हणाले, म्हातारपिंप्री ग्रामस्थांनी जलसंधारणाचे मोठे काम केले. कारखाना, जिल्हा परिषद किंवा जिल्हा बॅंकेशी निगडित कोणतेही काम म्हातारपिंप्रीकरांना सर्वोतोपरी सहकार्य करू, असेही नागवडे यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार राहुल जगताप म्हणाले, ‘विरोधी पक्षाचा आमदार असताना गेल्या चार वर्षांत मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकासकामे मार्गी लावली. उद्याच्या काळातदेखील कोणतेही काम सांगा, कधीच निधी कमी पडू देणार नाही. म्हातारपिंप्री ग्रामस्थांनी जलसंधारणाचे काम करून विकासाला चालना दिली.

यावेळी प्रतिभा पाचपुते, केशव मगर, सुभाष शिंदे, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, सरपंच सुभाष तावरे, उपसरपंच लता शिरसाठ, ग्रामसेवक अश्विनी व्यवहारे, विलास वाबळे, बापूसाहेब हिरडे, नितीन वाबळे आदी उपस्थित होते. महेश तावरे यांनी सूत्रसंचालन केले तर, विलास महामुनी यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)