अजनूजचा जवान ‘कपील गुंड’ शहीद

श्रीगोंदे  – श्रीगोंदे तालुक्‍यातील अजनुज येथील जवान कपील नामदेव गुंड (वय 25) हा काश्‍मीरमध्ये शहिद झाला. ही घटना समजताच अजनुजवर शोककळा पसरली आहे. काश्‍मीरमधील उधमपुर सेक्‍टर मधील भारतीय सैन्य दलाच्या स्वयंपाकगृहात स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, कपिल गुंड हा चार वर्षांपूर्वी भारतीय सैन्य दलाच्या इ. एम. इं. विभागात भरती झाला होता. दि. 15 नोव्हेंबर रोजी स्वयंपाक गृहात स्फोट झाला. या दुर्घटनेत कपील गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर उपचार चालू असताना त्याची प्राणज्योत मालवली. सोमवारी सकाळी अजनुज येथे लष्करी इंतमामात कपिलवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

रविवारी सकाळी श्रीगोंदा तालुका माजी सैनीक संघटनेचे अध्यक्ष भानुदास सपाटे यांनी अजनुज येथे जाऊन या दुर्देवी घटनेची माहिती दिली. पण नेमकी घटना कशामुळे घडली ही माहीती समजलेली समजली नाही. नामदेव गुंड हे सेवानिवृत्त फौजी आहेत. त्यांना कपील व सचिन ही दोन मुले आहेत.

कपील हा 2016 मध्ये भारतीय सैन्य दलात तर सचीन हा महाराष्ट्र पोलिस दलात भरती झाला होता. कपील याचे तीन वर्षांपुर्वी विवाह झाला. कपील यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील, भाऊ, बहिण असा परिवार आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
11 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)