श्रीगोंदे- कुकडीच्या चालू आवर्तनातून श्रीगोंदा तालुक्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे.हे पाणी चारीला पुरेल एवढे सुद्धा नाही. कुकडीच्या पाण्यासंदर्भात श्रीगोंदा तालुक्याची होत असलेली हेळसांड थांबवावी. तातडीने पूर्ण दाबाने ने पाणी सोडावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा येथील सामाजिक कार्यकर्ते गोरख आळेकर यांनी दिला आहे.
110 कि.मी.ला गेज 1100 क्युसेस पाहिजे आणि आता मिळतोय 950 क्युसेस 150 क्युसेस पाणी नक्की चाललंय कुठंय? टेल टु हेड फक्त श्रीगोंदेकरांनाच म्हणायचं का? खाली पालकमंत्री आहे म्हणून त्यांचा गेज कमी पडु द्यायचा नाही आणि 110 कि.मीच्या पाठीमागे भरणे चालु करायचे आम्ही श्रीगोंदेकरांना मध्येच लटकवलं.
आता शांत बसणार नाही उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत 200 क्युसेसनं पाणी न सोडल्यास कोणतीही पूर्व सूचना न देता आंदोलन करण्यात असा इशारा आळेकर यांनी दिला आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा