शिक्षणाप्रमाणे आरोग्यही महत्त्वाचे

अनुराधा नागवडे : मुलींच्या तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा उत्साहात

श्रीगोंदे – शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करताना विद्यार्थ्यांनी छंद जोपासले पाहिजेत. विद्यार्थ्यांनी सकस आहार घेऊन आपले आरोग्य जपले पाहिजे. शिक्षण घेऊन प्रगती करणे गरजेचे आहेच मात्र शिक्षणाप्रमाणे आरोग्यदेखील महत्त्वाचे असल्याचे मत जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांनी व्यक्‍त केले.

तालुक्‍यातील श्रीगोंदे फॅक्‍टरी येथील इंदिरा गांधी विद्यालयात जिल्हा क्रीडा विभाग व श्रीगोंदे तालुका क्रीडा समितीच्या वतीने मुलींच्या खो-खो स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. समारोप व पारितोषिक वितरण समारंभात नागवडे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी नागवडे कारखान्याच्या संचालिका अंजली रोडे होत्या.

स्पर्धेत यश मिळविलेले संघ पुढीलप्रमाणे : 14 वयोगट मुली- प्रथम-इंदिरा गांधी विद्या निकेतन, श्रीगोंदे फॅक्‍टरी, द्वितीय- नूतन मराठी विद्यालय शेडगाव, तृतीय-जि. प. प्रा. शाळा बाबुर्डी. 17 वयोगट मुली-प्रथम- न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव, द्वितीय-रेणुकादेवी विद्यालय पिंपळगाव पिसा, ततीय-भानेश्‍वर विद्यालय भानगाव. 19 वयोगट मुली प्रथम-छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदे, द्वितीय-नूतन मराठी विद्यालय शेडगाव, तृतीय-इंदिरा गांधी विद्या निकेतन, श्रीगोंदे फॅक्‍टरी.

यावेळी कारखान्याच्या संचालिका सुरेखा लकडे, उपसरपंच शुभांगी जंगले, राजेंद्र जामदार, उदयसिंह जंगले, मुख्याध्यापक दादाजी पाटील आदी उपस्थित होते. मंगेश काकडे यांनी सूत्रसंचालन केले. छाया लष्करे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)