हक्काच्या दफनभूमीसाठी डोंबारी समाजाचे अनोखे आंदोलन

श्रीगोंदे – तालुक्‍यातील हिंगणी दुमाला येथील डोंबारी समाजाला हक्काची दफनभूमी मिळण्याच्या मागणीसाठी सोमवारी तहसील कार्यालयासमोर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. दरम्यान, या आंदोलनात डोंबारी समाजाच्यावतीने पारंपरिक खेळ, कलेचे दर्शन घडविले.

चाळीस वर्षांपासून हिंगणीमध्ये डोंबारी समाजाची वीस कुटुंब वास्तव्यात आहेत. मात्र त्यांच्यासाठी दफनभूमी नाही. या कुटुंबांना दफनभूमीसाठी शासकीय जागा देण्याची मागणी या आंदोलनात करण्यात आली. तसेच डोंबारी समाजातील विधवा आणि अपंग व्यक्तींना शासकीय योजनांच्या लाभात प्राधान्य द्यावे आणि डोंबारी समाजातील कलाकारांना निवृत्तीवेतन सुरू करण्याचीदेखील मागणी यावेळी करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या आंदोलनात लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा सचिव संतोष शिंदे, अशोक चव्हाण, रामचंद्र चव्हाण, धर्मा पवार, लालू वाघ, दिलीप जाधव आदी सहभागी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)