डेंगीने घेतला तन्वीचा बळी; हिरडगावात शोककळा 

श्रीगोंदा – तालुक्‍यातील हिरडगाव येथील तन्वी रवींद्र दरेकर (वय 10) या चिमुकलीचा डेंगीने बळी घेतला. थोडसा ताप आला उपचारही वेळेवर सुरू झाले. पण डेंगीची लक्षणे उशीरा लक्षात आल्याने ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे हिरडगावमध्ये शोककळा पसरली आहे.

तन्वीला तातडीने पुण्यातील नामवंत दवाखान्यात दाखल करण्यात आले, पण आठ दिवसाच्या अथक प्रयत्नही आपुरे पडले. त्यातच तन्वीची प्राणज्योत मालवली. आज सकाळी दहा वाजता तन्वीला शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. जिल्हा परिषद शाळेतील 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी दोन्ही कार्यक्रमांचे संचलन दोन वर्षांपासून तन्वी करत होती. गावात अगदी लहानांपासून थोरांपर्यत तन्वी परिचित होती.

..तर उपकेंद्राला टाळे ठोकणार

हिरडगाव उपकेंद्रातील कर्मचारी सतर्क राहिले असते, तर तन्वीचा जीव वाचला असता. आरोग्य खाते गावासाठी बुजगावणे उभे केले का? आरोग्य विषयावर कुठलीही माहिती अधिकारी आणि कर्मचारी देत नाही उपकेद्रांत उपचारासाठी गेलेल्या लोकांना संबंधीत लोकांना अरेरावी ऐकावी लागते. संबंधीतांवर तत्काळ कार्यवाही न झाल्यास सोमवारी ग्रामसभा घेवून टाळे ठोकण्याचा इशारा हिरडगाव ग्रामस्थांनी दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)