श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक 2018 : गणेशनगरचे मतदार कोणाला ‘किंग’ करणार?

श्रीगोंदा नगरपरिषद निवडणूक रणसंग्राम : गणेशनगर – प्रभाग क्र. 5


-अर्शद आ. शेख

श्रीगोंदे : श्रीगोंदा नगरपालिकेच्या राजकारणात बिगबॉस असणाऱ्यांचा गणेशनगर हा प्रभाग आहे. नगरसेवक पदाची हॅट्ट्रिक केलेले फक्कड मोटे, दोन वेळा नगरसेवक व एकदा उपनगराध्यक्षपद भूषविलेले शहाजी खेतमाळीस, माजी मंत्री बबनराव पाचपुतेंचे निकटवर्तीय व बहुचर्चित नगरसेवक सुनील वाळके यांचा हा प्रभाग. आगामी निवडणुकीत या दिग्गजांसह इतर अनेक इच्छुकांनी देखील दंड थोपटले आहे. त्यामुळे गणेशनगर प्रभाग या चुरशीच्या लढतीत “बिगबॉस’ बनवतात अन्‌ कोणाला “नॉक आउट’ करतात याची चर्चा आतापासूनच रंगली आहे.

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीत 2009 चा अपवाद वगळता फक्कड मोटे यांनी तीन वेळा येथून बाजी मारली आहे. शहाजी खेतमाळीस यांनी 2009 मध्ये 162 मतांनी मोटे यांचा विजयी रथ रोखला होता. दहा वर्षे नगरसेवक व उपनगराध्यक्षपद भूषवित खेतमाळीस यांनी प्रभागावर आपली पकड मजबूत केली असताना 2014 साली पाचपुते गटाने त्यांना उमेदवारी डावलली. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे बंडखोर अण्णासाहेब शेलार यांचा छुपा प्रचार केल्याचा कांगावा खेतमाळीस विरोधकांनी केला.

प्रभागातील चर्चेतील उमेदवार

गणेशनगर प्रभागात भाजपतर्फे मनीषा सुनील वाळके, शहाजी खेतमाळीस, सुधीर खेडकर, पोपटराव बनसोडे यांची तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अलका फक्कड मोटे, विकास बोरुडे, नामदेव खामकर, पै.शांताराम पोटे, सुजाता बोरुडे, गोरख डाके, अंबादास मखरे, ऋषिकेश बोरुडे यांचे तर शिवसेनेकडून संतोष खेतमाळीस यांचे एकमेव नाव चर्चेत आहेत.

अन्‌ पाचपुतेंनी तो खरा मानून खेतमाळीस यांचे तिकीट कापले. तरी देखील पाचपुते यांच्याशी निष्ठा कायम ठेवत खेतमाळीस यांनी मागील सर्व निवडणुकीत पक्षाचे काम केले. खेतमाळीस यांच्यावर अन्याय झाल्याची उघड चर्चा राजकीय वर्तुळात होत होती.

एकनिष्ठतचे फलित म्हणून येणाऱ्या निवडणुकीत त्यांची उमेदवारी (पाचपुते गट) निश्‍चित मानली जाते. सुनील वाळके 2014 ला निवडून आले. पाचपुतेंचे अंत्यत विश्‍वासू नगरसेवक म्हणून त्यांची प्रतिमा आहे.

आक्रमक कार्यशैली व बेधडक व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचे नाव सतत चर्चेत असते. पाचपुतेंसाठी त्यांनी “गेमचेंजर’चा रोल केला आहे. या संदर्भाचा विचार करता गणेशनगरमध्ये राजकीय आखाड्यात रंग भरत आहे. सर्वसाधारण महिला जागेवर अलका फक्कड मोटे (कॉंग्रेस-राष्ट्रवादी) विरुद्ध मनीषा सुनील वाळके (भाजप) यांच्यात होणाऱ्या लढतीकडे शहराचे लक्ष लागले आहे. मोटे हे गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचे व्याही आहेत.

प्रभागाची व्याप्ती व आरक्षण

गणेशनगर प्रभाग क्र. 5 मध्ये बनसुडे मळा, गणेश नगर, देवकर वस्ती, मोरे वस्ती, वेताळवाडी, जंबोबेट, जावईनगर, डाकेमळा आदी भागांचा समावेश आहे. दोन जागांसाठी येथे सर्वसाधारण महिला व ओबीसीचे आरक्षण आहे.

मोटे सर्वताकदीने मैदानात उतरणार आहेत. वाळकेंच्या मागे माजी मंत्री बबनराव पाचपुतें ताकद व नियोजन कौशल्य आहे. त्याचप्रमाणे सुजाता दिगंबर बोरुडे व शिवसेनेचे संतोष खेतमाळीस यांच्या मातोश्रींचे नाव देखील चर्चेत आहे. त्यामुळे या प्रभागातील लढत चुरशीची होणार यात शंका नाही.

नागरिकांच्या मागास प्रवर्ग जागेवर भाजपकडून शहाजी खेतमाळीस यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांच्या विरोधात कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून विकास बोरुडे, नामदेव खामकर, पै. शांताराम पोटे, ऋषिकेश बोरुडे व गोरख डाके यांची नावे चर्चेत आहे. बोरुडे हे आ. राहुल जगताप यांचे निकटवर्तीय मानले जातात.

विक्रम घडविणारा वॉर्ड

उमेदवार निवडीपासून ते निकालापर्यंत सर्वांत संवेदनशील वॉर्ड म्हणून याची ख्याती आहे. माजीमंत्री पाचपुतेंचे हे आजोळ.त्यामुळे येथील निकालाला भावनिक झालर आहे. 2004 च्या निवडणुकीत पाचपुते गटाच्या वतीने शहाजी खेतमाळीस यांनी विक्रमी मताधिक्‍याने विजय मिळवला होता.सुमारे दीड हजार मतांचे हे लीड व रेकॉर्ड आजवर कोणी मोडले नाही.

मात्र स्वपक्षातील इच्छुकांच्या या भाऊगर्दीत राष्ट्रवादी कॉंग्रेस कोणाला संधी देणार हे पाहावे लागेल. जनतेतून नगराध्यक्षपदास इच्छुक असलेले गोरख आळेकर अंतिम टप्प्यात पर्याय म्हणून या वॉर्डात चाचपणी करीत आहे. नामदेव खामकर यांनी या वॉर्डात आधीपासूनच मोर्चेबांधणी केली आहे. आर या पार या इर्षेने टक्कर देण्यासाठी ते सज्ज आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)