श्रीगोंदा – येथे डेंगीसदृश आजाराचा फैलाव होत असल्याचे स्थिती समोर येत आहे. शहरातील एकाच घरातील तिघांना डेंगीसदृश आजाराची लागण झाल्याचे नुकतेच निष्पन्न झाल्याने खळबळ उडाली आहे.

तहसील कचेरीच्या मागे असलेल्या बनकर मळ्यात राहणारे निवृत्त प्राथमिक शिक्षक गेनूभाऊ बाजीराव गुणवरे यांच्या घरातील ते स्वत:, त्यांची पत्नी आशा गुणवरे आणि त्यांची नात सिद्धी नीलेश गुणवरे या एकाच घरातील तिघांना डेंगीची लागण झाली आहे. तिघांचेही अहवाल सकारात्मक ( पॉझीटीव्ह) आले आहेत.

गेनूभाऊ गुणवरे यांना दौंडच्या लोणकर रुग्णालयात तर सिद्धीला दौंडच्याच गजरे यांच्या रुग्णालयात दाखल केलेले आहे. आशा गुणवरे यांना श्रीगोंद्याच्या मचे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डेंगीसदृश साथीमुळे शहरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

नगरपालिका आणि आरोग्य विभागाने डेंगीच्या आजाराची तातडीने दखल घेऊन शहरात फॉगींग फवारणी आणि डास निर्मूलनाचे उपाय हाती घेण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)