भाजपशी युती नकोच; शिवसेनेचा निर्धार

गणेशोत्सवानंतर उद्धव ठाकरे यांची होणार सभा- कोरगावकर

नगर – महापालिकेच्या निवडणुकीत भाजपबरोबर युती करू नये, असा सुर कार्यकर्त्यांनी लावल्याने त्याच्या मताप्रमाणे युती न करण्याचा निर्धार शनिवारी झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत करण्यात आला. महापालिका निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी येथील हॉटेल यश पॅलेस येथे शिवसेना कार्यकर्त्यांसह नगरसेवकांची बैठक झाली. त्यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, उपनेते अनिल राठोड, जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, महापौर सुरेखा कदम, महिला संपर्कप्रमुख रिटाताई वाघ उपस्थित होते.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कोरगावकर यांनी स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी भाजपबरोबर युती करण्यास विरोध दर्शविला. तसेच निवडणुकी दरम्यान येणाऱ्या अडचणी मांडल्या. त्यावर संपर्कप्रमुखांनी कोणीही उमेदवारीसाठी हट्ट धरू नका. पक्षाशी एकनिष्ट आहात हे स्थानिक नेत्यांसह पक्षश्रेष्ठींनाही माहित आहे. त्यामुळे केवळ उमेदवारीसाठी हट्ट धरण्यापेक्षा मनात कोणत्याही प्रकारचा संकोच न ठेवता शिवसैनिक आहोत. याचा आपण अभिमान बाळगून आपण आपले जास्तीत जास्त उमेदवार कशा पद्धतीने निवडून आणता येतील. यासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले. दरम्यान भाजप युतीबाबत अनेक कार्यकर्त्यांनी नापसंती दर्शवत नगरमध्ये भाजप शिवसेनेसोबत युतीत प्रमाणिक राहत नाही. त्यामुळे महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युती नको असा सूर उमटला.

शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी महापालिकेच्या निवडणुकीबाबत कोणीही मनात कोणत्याही प्रकारचा संकोच बाळगू नये. या निवडणुकीसाठी जिल्हासह मुंबई येथुनहि पदाधिकारी शहरात येणार आहेत. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत नगरच्या महापालिकेवर एकहाती शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी सर्व शिवसैनिक अहोरात्र कष्ट करणार असल्याची ग्वाही दिली. या बैठकीस शहरातील विविध पदाधिकाऱ्यासह नगरसेवक, महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)