शिक्षक भरतीच्या उदंड झाल्या घोषणा

पात्रताधारकांमध्ये वाढली निराशा : शिक्षक भारती राज्यव्यापी आंदोलनाच्या तयारीत

परीक्षांवर परीक्षा… मात्र हाती काहीच नाही!

राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने 2013 पासून सहा वेळा पात्रता परीक्षा घेतल्या. त्याचबरोबर गुणवत्तेच्या आधारावर पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती करण्यासाठी अभियोग्यता चाचणीही घेतली. त्याची गुणवत्ता यादीही जाहीर केली. पवित्र पोर्टलवर उमेदवारांची नोंदणीही झाली. मात्र शिक्षक भरतीवरील बंदी उठविण्याबाबत पुढे काहीच कार्यवाही झालेली नाही.

नगर – राज्यात मागील 8 वर्षांपासून शिक्षक भरतीच झालेली नाही. या कालावधीमध्ये हजारो अध्यापन पदवीधारक पदव्या घेऊन बाहेर पडले. मात्र शासन केवळ पात्रता परीक्षा, अभियोग्यता चाचणी अशा परीक्षा घेण्यापलीकडे काहीच हलचाली केल्या नाहीत. पात्रताधारकांमध्ये मोठ्या प्रमाणात सरकारबद्दल चिड निर्माण झाली आहे.

-Ads-

प्राध्यापक, प्राचार्यांच्या भरतीवरील स्थगिती उठविण्यात आली आहे. त्यापाठोपाठ आता शिक्षक भरतीवरीलही स्थगिती उठेल, अशी अपेक्षा अध्यापन पदवी पात्रताधारकांना वाटत होती. मात्र ही अपेक्षा फोल ठरली. राज्यात 7 ते 8 लाख अध्यापन पात्रताधारक आहेत. शिक्षक भरतीवर घातलेली स्थगिती उठविली जाईल. या आशेवर ते आलेला दिवस ढकलत आहेत.

“अध्यापन पात्रताधारक, अनेक मुला-मुलींचे भवितव्य धोक्‍यात आले आहे. त्यामुळे सरकारने या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करुन शिक्षक भरती तत्काळ सुरु करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पूर्वी अध्यापन शिक्षण घेतल्यानंतर शाळांमध्ये सहज नोकरी मिळायची. दहावी-बारावीमध्ये सर्वाधिक गुण मिळविणारे बहुतांष विद्यार्थी अध्यापनाकडे वळायचे. काही वर्षांपासून शिक्षक भरतीवर घालण्यात आलेल्या बंदीमुळे या पदव्यांना काहीच महत्व उरलेले नाही. नवी पिढी शिक्षकीपेशाला सरळ नकार देऊ लागली आहे. त्यामुळे गुणवंत शिक्षकांचा मोठा वनवा निर्माण होणार आहे.
– सुनील गाडगे, शिक्षक नेते, शिक्षक भारती

मात्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षक भरतीसाठी कुठलीच डेंडलाईन पाळलेली नाही. जून 2018 पर्यंत शिक्षक भरतीला सुरुवात होईल, असा शब्द दिला होता. मात्र त्यांना तो पाळता आलेला नाही. राज्यात शिक्षकांच्या एकूण रिक्त जागा किती आहेत. त्यापैकी किती जागा भरल्या जाणार आहेत. अशी कुठलीच माहिती देण्यास शिक्षण विभाग तयार नाही.

सातत्याने शिक्षक भरतीवरील स्थगिती उठविण्यासाठी शिक्षक भारती संघटनेसह अनेक संघटनांनी आंदोलने करत आहेत. जिल्हास्तरावर तसेच शिक्षक आयुक्त, शिक्षक संचालक यांच्या कार्यालयासमोर अनेकदा धरणे आंदोलन करण्यात आले, तरीही शासनाला जाग येत नाही.

तेव्हा पुन्हा एकदा येत्या 26 नोव्हेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती शिक्षक नेते सुनील गाडगे व कार्याध्यक्ष अप्पासाहेब जगताप यांनी दिली. या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी शिक्षक भारती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सहविचार सभा झाली. त्यात आंदोलनाची दिशा निश्‍चित करून कार्यवाही करण्याचे नियोजन केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
1 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)