खाऊ राजकारण करणाऱ्यांना ‘धपाटा’

पेन्शन संघटनेचे राजेंद्र ठोकळ यांचा इशारा : पोलीस बळाचा वापर करणाऱ्या बॅंक सभेवर बहिष्कार

सत्ताधाऱ्यांना शब्दाचा विसर…

डिसीपीएसधारकांनी निधीत वाढ करण्यासाठी सत्ताधारी संचालक मंडळला निवेदन दिले होते. बॅंकेचे अध्यक्ष रावसाहेब रोहकले यांनी त्यावेळी शिष्टमंडळाला निधी पाच लाख रुपयांचा करतो, असा शब्द दिला होता. त्याचा विसर पडल्याची आठवण पेन्शन हक्क संघटनेचे राज्य नेते योगेश थोरात यांनी यावेळी करून दिली.

नगर – सनदशीर मार्गाने मयत डिसीपीएसधारक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करा, अशी पेन्शन हक्क संघटनेची शिक्षक बॅंकेकडे मागणी आहे. परंतु या मागणीचे सत्ताधाऱ्यांनी भावनात्मक भांडवल केले आहे. आता मात्र हे होऊ देणार नाही. मांजर डोळे झाकून दूध पिते. त्यामुळे तिला वाटते, की आपल्याला कोणी पाहत नाही. मात्र तिला “धपाटा’ बसल्यावर ती पळत सुटते. शिक्षक बॅंकेतील खाऊ राजकारण चांगलेच माहित आहे. आता न्याय हक्कासाठी सत्ताधाऱ्यांना “धपाटा’ घातल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा खणखणती इशारा पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ठोकळ यांनी दिला आहे.

शिक्षक बॅंकेची 16 सप्टेंबरला वार्षिक सभा होत आहे. सत्ताधाऱ्यांनी या सभेसाठी पोलीस बंदोबस्त मागविला आहे. डिसीपीएसधारक कर्मचाऱ्यांच्या कुटंबीयांना मदत निधी दोन लाखावरून पाच लाख रुपये करण्याचा ठराव सभेवर सोडला आहे. हा मुद्दा गेल्यावर्षी देखील सभेसमोर आला होता. त्यावेळी सत्ताधाऱ्यांनी त्याला वाटाण्याच्या अक्षता दाखविल्या. यावेळी देखील तेच होणार असल्याचे चित्र आहे. पेन्शन हक्क संघटना यावर आक्रमक झाली आहे. यावेळी भावनात्मक राजकारणाला बळी पडणार नाही, असा इशारा संघटनेने दिला आहे.

ठोकळ म्हणाले, “सत्ताधाऱ्यांना सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचे काही देणेघेणे नाही. सत्ताधारी संचालक मंडळ व त्यांचे गुरूमाऊली मंडळ हे संगनमताने डिसीपीएसधारकांवर अन्याय करत आहे. त्यात सातत्य आहे, याची जाणिव अध्यक्ष रावसाहेब रोहकले यांनी सभेसाठी पोलीस बळाच्या भाषेचा वापर करण्याच्या इशाराने अधिकच गडद झाली आहे.’ गलिच्छ राजकारण सत्ताधाऱ्यांना लखलाभ, असेही ठोकळ म्हणाले.

विश्वस्त बाजीराव मोढवे, राज्य नेते योगेश थोरात, सरचिटणीस भाऊसाहेब पाचरने, कार्याध्यक्ष सचिन नाबगे, कोषाध्यक्ष अमोल सोनवणे, उच्च अधिकार केशव कोल्हे, जिल्हा प्रसिध्दीप्रमुख शैलेश खणकर आदींनी डिसीपीएसधारकांच्या मागणीसाठी सक्रिय आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)