साई संस्थानच्या वाहनांवरील शासनाचे नाव काढण्याचा आदेश

शिर्डी – येथील साई संस्थानच्य वाहनांवर टाकलेले “महाराष्ट्र शासन’ हे नाव काढून टाका, अन्यथा या वाहनांची नोंदणी रद्द करू, अशी नोटीस परिवहन अधिकाऱ्यांनी साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांना बजावली आहे.
सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी श्रीरामपूर येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे ई-मेलद्वारे तक्रार दिली होती. त्यात साईबाबा संस्थानच्या वाहनांवर बेकायदेशीररित्या महाराष्ट्र शासन असे नाव वापरले गेल्याचे निदर्शनास आणले होते.

उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत साईबाबा संस्थानच्या दोन वाहनांवर (क्रमांक एम.एच. 17 एजे 8889 व एम.एच. 17 बीव्ही 1510) महाराष्ट्र शासन असे नाव बेकायदेशीरपणे टाकून त्याचा वापर करीत असल्याचे आढळले. या तक्रारीची परिवहन अधिकारी अ. अ. खान यांनी त्वरीत दखल घेतली. त्यांनी संस्थानच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना मोटार वाहन कायदा 1988 अन्वये नोटीस बजावत दोन्ही वाहनांवर “महाराष्ट्र शासन’ हे नाव वापरले जात असून ही बाब गंभीर आहे, असे म्हटले आहे. या वाहनांवरील महाराष्ट्र सरकारचे नाव काढून टाकावे.

नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत खुलासा करावा. खुलासा सादर न केल्यास आपले काही म्हणणे नाही, असे गृहीत धरून वाहनाची नोंदणी रद्द करण्यात येईल, असा इशारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. साई संस्थानच्या या गाड्या वरिष्ठ अधिकारी वापरत आहेत. अनेक वेळा या गाड्यांवर दिवेही लावले जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. दरम्यान, परिवहन विभागाच्या आदेशाचे शिर्डीतील लोकांनी स्वागत केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)