दसरा मंगलस्नानासाठी १७०० किमीहून आणणार गंगाजल

ओमसाई ग्रुपच्या 30 सदस्यांची शिर्डी ते रामेश्‍वर पदयात्रा

शिर्डी – साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्यानिमित दसऱ्याच्या मंगल स्नानासाठी सतराशे किलोमीटरहून श्री क्षेत्र रामेश्‍वरमच्या 21 कुंडातील गंगाजल आणण्यात येणार आहे.ओम साई ग्रुपचे संस्थापक नाना गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली तीस पदयात्रींनी कावडीने गंगाजल आणण्यासाठी सहभाग घेतला आहे.सोमवारी शिर्डी येथील खंडोबा मंदिरापासून मोठ्या उत्साहात यात्रेस प्रारंभ झाला.

-Ads-

यावर्षी ऑक्‍टोबरमध्ये विजयादशमीला साईबाबांच्या समाधीला शंभर वर्ष पूर्ण होत आहे. साईबाबा संस्थानने विविध ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. येथील ओम साई ग्रुपच्या वतीने श्री क्षेत्र रामेश्‍वरम ते शिर्डी असा सुमारे 1 हजार 700 किमीचा पायी प्रवास करून साईमूर्तीच्या जलाभिषेकासाठी गंगाजल आणण्यात येणार आहे. यात तीस पदयात्रींनी सहभाग दर्शविला असून इंदौर, मुंबई, पुणे, नाशिक, नगर आणि नेपाळ येथील युवकांचा समावेश असल्याचे नाना गुरव यांनी सांगितले.

सोमवारी सायंकाळी चार वाजता खंडोबा मंदिरापासून फटाक्‍यांच्या आतषबाजीत पदयात्रेला सुरुवात झाली. यापूर्वी 2004 मध्ये हरिद्वार ते शिर्डी असा दोन हजार किमीपेक्षा जास्त पायी प्रवास करून गंगाजल आणले होते. 2008 मध्ये श्री क्षेत्र देवप्रयाग ते शिर्डी 51 दिवस पायी चालत प्रवास केला होता.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)