साईभक्ताचे 61 हजारांचे साहित्य चोरणाऱ्या तिघांना अटक

शिर्डी पोलिसांची कारवाई : मोटारीतून चोरले होते साहित्य

शिर्डी – साई दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे चार मोबाईल व कॅमेरा असा 61 हजार रुपयांचा चोरांनी लांबविलेले साहित्य शिर्डी पोलिसांनी तपास करत हस्तगत केले. न्यायालयाच्या परवानगीने हा मुद्देमाल साई भक्ताकडे पुन्हा सोपविण्यात आला आहे. दरम्यान, आदेश दत्ताञय नागरगोजे, दाऊद शाकीर शेख, सद्दाम राजकुमार राणा ( सर्व रा.शिर्डी ) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

स्वप्नील परशुराम पिंगळे (रा. जि. रायगड) हे साई दर्शनासाठी शिर्डी येथे आले होते. नगरपंचायत शेजारी असलेल्या पार्किंगमधे त्यांनी आपली मोटार लावली होती. या मोटारीतून चोरांनी मोबाईल आणि कॅमेरा आदी वस्तू चोरून नेल्या होत्या. पिंगळे यांनी याप्रकरणी शिर्डी पोलिसांकडे तक्रार दिली होती. शिर्डी पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करत यात तीन चोरांना पकडण्यात यश मिळविले.

या तिघांकडून चोरीचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, उपअधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अरविंद माने, कर्मचारी प्रसाद साळवे, किरण कुऱ्हे, बाबासाहेब सातपुते, अजय अंधारे यांनी या चोरीचा तपास केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)