चेंबरमध्ये गुदमरून शिर्डीत दोघांचा मृत्यू

शेतीसाठी लागणारे पाणी विद्युत पंपाच्या सहाय्याने उपसताना घडली घटना

शिर्डी  – शेतीसाठी लागणारे पाणी थेट सांडपाणी वाहून नेणाऱ्या चेंबरमधून विद्युत पंपाच्या साहाय्याने उपसा करणाऱ्या दोन शेतकऱ्यांचा चेंबरमध्ये गुदमरून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी 5 च्या सुमारास शिर्डी येथील कालिकानगर परिसरातील कोतेवस्ती घडली. गंगाधर विठ्ठल गाडेकर (वय 42) आणि संदीप अशोक कोते (वय 48, दोघे रा. कालिकानगर) अशी त्या शेतकऱ्यांची नावे आहेत. त्या दोघांना येथील साईबाबा सुपरस्पेशालिटी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषीत केले.

शिर्डी नगरपंचायतने शहरातील मलमुत्र मिश्रित सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी भुमिगत गटारांची निर्मिती केली आहे. या गटारीसाठी ठिकठिकाणी चेंबर खोलण्यात आली असुन, या ठिकाणाहुन काही शेतकरी आपल्या शेतीसाठी पाणी घेतात. हे पाणी खराब असून यामध्ये मोठ्या प्रमाणात कचराही असतो.

यापूर्वीही असाच प्रकार घडून यात चौघांना जीव गमवावा लागला होता. त्यामुळे यापुढे शेतीस पाणी मिळो अथवा ना मिळे जे शेतकरी चेंबरमध्ये विद्युत पंप टाकून पाणी घेतील, त्यांच्या नगरपंचायतच्या माध्यमातून कायदेशिर कारवाई करणार.
-अभय शेळके, नगरसेवक

शेतकरी यात विद्युत मोटार बसवून पाण्याचा उपसा करतात. मात्र बऱ्याचदा मोटारीत बिघाड होतो. या दुरुस्तीसाठी शेतकरी चेंबरमध्ये उतरतात आणि येथे तयार झालेल्या गॅसच्या प्रादुर्भाव होवून शुध्द हरपतात व चेंबरमध्ये गुदमरुन मरण पावतात. यापूर्वी चार शेतकऱ्यांचा अशा पद्धतीने मृत्यू झाला होता. तरी शेतकरी आजही या चेंबरमधून पाणी शेतीसाठी वापरतांना दिसत आहेत.

कालिकानगर बन परिसरातील दोन शेतकरी शिर्डी-बिरेगांव रस्त्यावरील चेंबरमध्ये उतरले आणि गॅसमुळे शुद्द हरपून बाहेर आलेच नाही. या दोघांना बाहेर काढण्यासाठी प्रथम नगरपंचायतचे पथक आले, मात्र पूरक साहित्य नसल्याने त्यांना यश आले नाही. त्यानंतर साई संस्थानचे पथक आल्यानंतर त्यांना बाहेर काढून सुपर हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले. मात्र या दोघांचाही दुर्दैवी मृत्यु झाला. शेतीसाठी पाणी घेत असतांना विद्युत पंपात बिघाड झाल्याने ते पाहण्यासाठी शेतकरी खाली उतरले मात्र बाहेर आले नाही आणि त्यांचा मृत्यू झाला, तर त्यांना वाचवण्यासाठी चेंबरमध्ये गेलेल्या एकाला सुखरुप काढण्यात यश आले.

दिवाळीच्या सणात दोन जणांना शेतीच्या पाण्यासाठी जीव गमवावा लागला. शेतकरी आपली तहान भागवण्यासाठी तसेच पिक उभे करण्यासाठी धडपड करत असतो. त्यातून अशा घटना वारंवार शिर्डी आता घडू लागल्या आहेत. गेल्या वर्षी अशा एका घटनेने शिर्डीत शोककळा पसरली असतांना पुन्हा ऐन दिवाळी उत्सवात ही दुर्देवी घटना घडल्याने शिर्डीत हळहळ व्यक्त होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)