निवृत्त जवानाचा शिर्डीत अंदाधुंद गोळीबार

नवीन मोटार विकत घेतल्याचा आनंदातून चार राऊंड हवेत फायर


पोलिसांनी केले रायफल व काडतूस जप्त

शिर्डी – आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असलेल्या साईबाबांच्या शिर्डीत निवृत्त जवानाने आपल्याकडील रायफलमधून अंदाधुंद गोळीबार करून भाविकांत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार बुधवारी (दि.5) मध्यरात्री घडला. दरम्यान संबंधिताकडून पोलिसांनी रायफल जप्त केली असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी पुष्पराज रामप्रसाद सिंग (वय 38, रा. हटवा, मध्यप्रदेश) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पुष्पराज याने नवीन कार घेतली. त्यानिमित्त तो आपल्या मित्रांबरोबर बुधवारी (दि. 5) शिर्डीत आला होता. तो शहरातील पालखी मार्गावरील हॉटेल कौशल्यामध्ये मित्रांसोबत थांबला होता.

दरम्यान, पुष्पराज याने रात्री 1 वाजण्याच्या सुमारास नवीन कार विकत घेतल्याचा आनंदातून आपल्या रायफलमधून चार राऊंड हवेत फायर केले. साईबाबांची शेजारती संपल्याने शहरातील रस्त्यांवर भाविकांची वर्दळ होती. यादरम्यान रात्रीच्या वेळी भाविकांना घाबरविण्यासाठी पुष्पराजने त्याची रायफल बाहेर काढली. तसेच येणाऱ्या-जाणाऱ्या भाविकांना आपल्याकडील शस्त्राने धाक दाखवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले.

दरम्यान या घटनेचे वृत्त शिर्डी पोलिसांना समजताच पोलीस उपनिरीक्षक अशोक खरात यांच्यासह पोलिसांचे पथक मंदिर परिसरात दाखल झाले. पोलिसांनी शोधमोहीम राबवून पुष्पराज यास रायफल व तीन जिवंत काडतुसांसह ताब्यात घेतले.
पोलिसांनी पुष्पराज याच्याकडे चौकशी केली असता, त्याने आपल्याकडे शस्त्रपरवाना असल्याचे सांगितले. गोळीबार करताना तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे समजते. गोळीबाराच्या या घटनेमुळे शिर्डीतील भाविकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, मंदिरापासून हाकेच्या अंतरावर अशा पद्धतीने गोळीबार होणे, पोलीस यंत्रणेला एक प्रकारचे आव्हान असल्याचे समजले जाते.

सुदैवाने गोळीबारात कोणालाही इजा झाली नाही. दरम्यान नवीन गाडी घेतल्याच्या आनंदात फायर केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली आहे. त्याच्याविरुद्ध शिर्डी पोलिसांत भारतीय हत्यार प्रतिबंध कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक अरविंद माने व पोलीस उपनिरीक्षक अशोक खरात तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)