जमिनीचे प्रस्ताव देणाऱ्यांची नावे साई संस्थानने जाहीर करावीत

file photo

उपनगराध्यक्ष गोंदकर, कोते यांचे आव्हान

शिर्डी  – साईबाबा संस्थान व नागरिकांतील वाद सध्या चांगलाच चिघळला आहे. त्यातच साई संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी आंदोलनकर्ते जामिनी घेण्यासाठी हे आंदोलन करीत आहेत, असे वक्तव्य केल्याने. आता शिर्डीकर चांगलेच संतापले असून, साईबाबा संस्थानकडे कोणी जामिनी घेण्याबाबत प्रस्ताव दिला, ते जाहीर करावे, अन्यथा माफी मागावी, असा इशारा उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर व माजी उपनगराध्यक्ष विजयराव कोते यांनी दिला आहे.

साईबाबांच्या झोळीतला पैसा शिर्डीतला विकास झाल्याशिवाय बाहेर देता कामा नये, यासाठी लोकशाहीच्या मार्गाने कॉंग्रेसच्या वतीने साई संस्थानच्या विश्वस्तांविरोधात आंदोलन मागील पंधरवाड्यात करण्यात आले. या आंदोलनाला वेगळी दिशा देऊन जमिनी खरेदी-विक्री करण्याचा धंदा असलेल्या कॉंग्रेसच्या एका गटाने आंदोलन केल्याचा आरोप हावरे यांनी केल्याने कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी व आपने साई संस्थानच्या प्रशासनाला लेखी पत्र देऊन शिर्डीचा विकास झाल्याशिवाय साई संस्थानचा निधी बाहेर देण्यास हरकत घेतली.

राष्ट्रवादी ,शिवसेना आणि आपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या जमिनी संस्थानने घेण्याबाबत हा विरोध नोंदवला आहे का, याचा लेखी खुलासा साई संस्थानचे अध्यक्ष हावरे यांनी करावा. कॉंग्रेसच्या वतीने पंधरा दिवसांपूर्वी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांना निवेदन देऊन आंदोलनकर्त्या 17 कॉंग्रेस कार्यकर्त्यांपैकी त्यांच्या जमिनी साई संस्थानने घ्याव्यात, यासाठी प्रस्ताव दिला आहे का, जर असा प्रस्ताव दिला असेल, तर त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा, जर आंदोलकांपैकी कोणीही त्यांच्या जमिनी संस्थानला देण्याबाबतचा प्रस्ताव दिला नसेल, तर संस्थानचे अध्यक्ष हावरे यांनी साईभक्त व शिर्डी ग्रामस्थांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी विजय कोते यांनी केली.

लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार असताना साईंबाबांची झोळी वाचवण्यासाठी झालेल्या आंदोलनाला बदनाम करण्याचे काम हावरे व विश्‍वस्तांनी केले आहे. दोन वर्षांत साई संस्थानच्या विश्वस्त मंडळाने साईभक्तांच्या सोयीसाठी शिर्डीत कोणतेही काम केले नाही. शिर्डीच्या विकासाला ढबूही दिला नाही. उलट पूर्वीच्या विश्‍वस्तांनी केलेल्या विकासकामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न हावरे हे करित आहेत. शिर्डीचा विकास जर केला असेल, तर साईसेवेची वर्षपूर्ती ही पुस्तिका शिर्डीतील जनतेला उपलब्ध करून द्यावी, असे खुले आव्हान आपण डॉ. हावरे यांना देत असल्याचे गोंदकर व कोते यांनी स्पष्ट केले.

डॉ. हावरे यांच्या कारभाराचा आजवर विविध आंदोलनांच्या माध्यमातून आम्ही पर्दाफाश केलेला आहे. यापुढेही करतच राहाणार आहोत. शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण देण्यामागेही हावरे यांचीच कुटनिती होती. आंदोनलकर्त्यांना बदनाम करण्यासाठी हावरेंनी खोटे आरोप केले आहेत.

ज्या आंदोलनकर्त्यांनी जमिनी घेण्याबाबतचा प्रस्ताव संस्थानकडे दिला असेल, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा आंदोलनकर्त्यांची बदनामी केल्याबद्दल जाहीर माफी मागावी, अन्यथा हावरे व स्थानिक विश्‍वस्तांना शिर्डीत प्रवेश दिला जाणार नाही, असा इशारा गोंदकर व कोते यांनी दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)