तिसऱ्या मजल्यावरून पडून गर्भवती महिलेसह मुलाचा मृत्यू

शिर्डी – शिर्डी शहरातील गणेशवाडी भागात इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून गर्भवती माता आणि तीन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. दरम्यान, ही आत्महत्या आहे की घातपात, याबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. वैशाली शिंदे व मुलगा अथर्व शिंदे असे मृत्युमुखी पडलेल्या माय-लेकांचे नाव आहे.

दरम्यान, आमच्या मुलीचा सासरच्या लोकांनी घातपात केला असल्याचा आरोप मयत वैशालीच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. यातील आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी करत सदर मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, रविवारी (दि. 28) सकाळच्या सुमारास शिर्डीतील गणेशवाडी भागात राहणाऱ्या वैशाली साईदास शिंदे, तसेच तीन वर्षांचा मुलगा अथर्व तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने त्यांना जखमी अवस्थेत तातडीने साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात दाखल केले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र या दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. ऐन सणासुदीच्या काळात ही घटना घडल्याने शहरात एकच खळबळ माजली आहे. याबाबत उलटसूलट चर्चेला उधाण आले आहे. सदर महिला गर्भवती असल्याने या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे.

याबाबत माहेरकडील नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त करत आमच्या मुलीच्या मृत्यूस सासरकडील नातेवाईक जबाबदार असल्याचा आरोप करत, पोलिसांनी आरोपींना तत्काळ अटक करावी, अशी मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. सासरचे सर्व नातेवाईक फरार झाले असल्याचे समजते. या घटनेबाबत शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)