दुष्काळ निधी दिल्याबद्दल साई संस्थानचे मनसेकडून कौतूक

शिर्डी – साईबाबा विश्‍वस्तांच्या वतीने दुष्काळासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये 50 कोटी रुपये निधी देण्याच्या निर्णयाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कोते यांनी अभिनंदन केले असून साईबाबा संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांची भेट घेवून त्यांना तसे पत्र दिले.

गुरुवारी साईबाबा विश्‍वस्त बैठक आयोजन करण्यात आले होते. यावेळी साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्‍वस्त भाऊसाहेब वाकचौरे, मोहन जयकर, मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, उपजिल्हाधिकारी मनोज घोडे, उपकार्यकारी अधिकारी बाबासाहेब घोरपडे आदीसह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी कोते यांनी राज्यातील दुष्काळग्रस्तांना साईबाबा संस्थानने मुख्यमंत्री सहायता निधीस 50 कोटी रुपये देण्याच्या निर्णयाचे हावरे यांचे अभिनंदन करून प्रथम शिर्डी नगरपंचायतला निधी द्यावा अशी मागणी डॉ. हावरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दुष्काळामुळे राज्यातील अनेक शेतकरी बांधव आत्महत्या करीत आहे. साईबाबांच्या दानपेटीत महाराष्ट्रातील तमाम जनता दान करीत आहेत. या दानावर महाराष्ट्रातील जनतेचा अधिकार आहे. आपण करीत असलेले कार्यबरोबरच शिर्डी शहराचा विकासाला प्रथम प्राधान्य साईबाबा संस्थान दिले पाहिजे. आजपर्यंत जो निधी नगर पंचायतने मागणी करून मंजूर होऊन पडलेला आहे तो त्वरित नगरपंचायतला देण्यात यावा जेणे करून शिर्डीचा विकास झपाट्याने होण्यास अधिक मदत होईल. आणि रखडलेली कामे पूर्णत्वास जाईल अशी निवेदनाद्वारे विनंती करून या विषयावर आजच निर्णय घ्यावा अशा आशयाचे निवेदनपत्र डॉ. हावरे यांना देण्यात आले.

यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष राजेश लुटे, विजय मोगले, प्रसाद महाले, प्रशांत वाकचौरे, गणेश जाधव, राहुल फुंदे, कृष्णा धुमसे, ईश्वर नजन, हरीश लुटे, विकास धुमसे, रामनाथ सदाफळ, सुधाकर वाघमारे, ज्ञानेश्वर जगदाळे, अक्षय आढाव, अमोल नितनवरे, कुणाल सांभारे, अक्षय देवकर, कैलास वाघ आदि मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)