आर्थिक मदतीची फाईल अडकली लालफितीत : रोईंगपटू दत्तू भोकनळ

आशियाई स्पर्धेतील सुवर्ण विजेत्या रोईंगपटू दत्तू भोकनळची खंत : शिर्डीत साईसमाधीचे घेतले दर्शन

शिर्डी – ग्रामीण भागातील युवकांना विविध क्रीडा प्रकारामध्ये सहभागी होण्यासाठी केंद्र व राज्य सरकार खेळाडूंना प्रोत्साहन देते. आशियाई स्पर्धेतील सहभागासाठी राज्य शासनाकडे एक महिन्यापूर्वी पाठपुरावा केला होता. सुवर्णपदक जिंकून मायदेशी परतलो, मात्र अद्यापही आर्थिक मदतीची फाईल सरकारी बाबूंच्या लालफितीत अडकल्याची खंत सुवर्णपदक विजेता रोईंगपटू दत्तू भोकनळ याने व्यक्‍त केली.

आशियाई क्रीडा स्पर्धेत सांघिक रोइंग क्रीडा प्रकारात देशाला पहिले सुवर्णपदक जिंकून देणारा महाराष्ट्रीयन खेळाडू दत्तू बबनराव भोकनळ यांनी शनिवारी दुपारी मध्यान्ह आरतीनंतर साईसमाधीचे दर्शन घेतले. या वेळी शहर भाजपच्या वतीने शहराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांच्या हस्ते त्याचा गौरव करण्यात आला. यावेळी तुकाराम गोंदकर, रमेश बिडये, डॉ. संतोष खेडलेकर, भाजयुमोचे किरण बोऱ्हाडे, सचिन आरणे आदी भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

दत्तू भोकनळची खंत

स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी राज्य शासनाकडे आर्थिक मदत मागितली आहे. मात्र मदतीची फाईल सरकारी बाबूंच्या लालफितीत अडकली. त्यामुळे मला आर्थिक चणचणीचा सामना करावा लागल्याची खंत भोकनळने व्यक्‍त केली. केंद्र व राज्य शासन खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील असताना प्रशासकीय यंत्रणा कुचकामी ठरत आहे.

ग्रामीण भागातील मुलांमध्ये क्रीडाच्या विविध प्रकारात कौशल्य सिद्ध करण्याचे प्रचंड सामर्थ्य आहे. मात्र आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मोठा खर्च पेलवू शकत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातून खेळाडू तयार होत नसल्याचे वास्तव त्याने मांडले. वैयक्‍तिक खेळात अडचणी खूप आहेत.इतर खेळाच्या तुलनेत रोईंग खेळाडूला फारसे महत्त्व मिळत नसल्याचेही त्याने सांगितले. 2019 च्या ऑलम्पिक स्पर्धेत जाण्याची प्रबळ इच्छा असून यासाठी मोठा खर्च आहे, तो पेलवणारा नसल्याचेही त्याने सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)