अन्यथा… ‘चक्‍काजाम’ आंदोलन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा

शेवगाव – चालू गळीत हंगामात उसाला विनाकपात 3100 रुपये प्रतिटन भाव मिळावा, मागील हंगामात गळीत झालेल्या उसाचे विनाकपात 2500 रुपयेप्रमाणे पेमेंट मिळावे, तसेच केदारेश्वर कारखान्याकडील पेमेंट संबंधितांच्या खात्यावर जमा केल्याशिवाय कारखाना सुरू करण्यात येऊ नये आदी प्रमुख मागण्या येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत मार्गी न लागल्यास 19 नोव्हेबरला तालुक्‍यातील ऊस वाहतूक करणारी वाहने अडवून चक्काजाम आंदोलन छेडले जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यासंदर्भात तहसीलदारांना संघटनेने आज निवेदन दिले. निवेदनात हुमणीबाधित क्षेत्राचे पंचनामे त्वरित करावेत आणि बोंडअळीचे उर्वरित अनुदान संबंधितांच्या खात्यावर जमा करावे. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी बाहेरच्या काट्यावर केलेले त्यांच्या ऊसाचे वजन ग्राह्य धरण्यात यावे. दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन छावण्याऐवजी जनावरांना दावणीला चारा द्यावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

निवासी नायब तहसीलदार मयूर बेरड यांनी निवेदन स्वीकारले. निवेदनावर संघटनेचे तालुकाध्यक्ष संतोष गायकवाड, शहराध्यक्ष दत्तात्रय फुंदे, बाळासाहेब फटांगडे, संदीप मोटकर भीमराज भडके, महेश भागवत, प्रवीण म्हस्के, चंद्रकांत पाखरे, विठ्ठल कराड, अंबादास भागवत, राजेंद्र डाके, अर्जून देवढे, अमोल देवढे, विठ्ठल बडे, रामनाथ तावरे, दादासाहेब पाचारणे आदींच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)