शेवगावात वर्षभर विविध आध्यात्मिक कार्यक्रम

शेवगाव – आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक गुरूवर्य जोग महाराज निर्याण शताब्दी वर्ष महोत्सवानिमित शेवगावात आगामी वर्षभर आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांच्या नियोजनाची धामधूम आतापासून सुरू झाली आहे. सन 2017 मध्ये याच संस्थेच्या शताब्दी महोत्सवात एक लाखावर भाविकांची उपस्थिती व त्या सर्वांसाठी पुरणपोळीच्या महाप्रसादाच्या नियोजनबध्द कार्यक्रमाने व त्यानिमित झालेल्या अनेक विश्व विक्रमामुळे प्रकाश झोतात आलेले आखेगावच्या जोग महाराज संस्कार केंद्राचे प्रमुख राम महाराज झिंजुर्के यांनी हा नविन उपक्रम हाती घेतला आहे.

वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक जोग महाराज यांचा निर्याण शताब्दी महोत्सव आगळ्यावेगळ्या पध्दतीने साजरा करण्याचे नियोजन आतापासून करण्यात आले आहे. यानिमित्त शंभर कोटी श्रीरामकृष्ण हरि नामाचा जप करण्याचे विक्रमी आयोजन आहे. त्यासाठी राम महाराजांनी साडेतीन हजार भाविकांच्या सहभागाची आखणी केली असून प्रत्येक भाविक रोज एक हजार जप सलग 300 दिवस करणार आहे. म्हणजे उद्दीष्टापेक्षा पाच कोटीचा जप अधिकच होणार आहे.

संस्कार केंद्रामार्फत आगामी वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यात युवकामध्ये जबाबदारीची जाणीव व्हावी, कुटूंबातील ज्येष्ठा प्रति सन्मानाची भावना वृद्धिंगत करणे, संस्कृती जपणे, रक्तदान, अवयव दानाचे महत्व रुजवणे तसेच निबंध व वक्तृत्व अशा विविध स्वरुपाच्या स्पर्धाचे आयोजनही वर्षभर करण्यात आले आहे.

आता जोग महाराजांच्या निर्याणाला 27 डिसेंबर 2019 ला शंभर वर्ष होत आहेत. त्याची तयारी आताच सुरु झाली आहे. आगामी वर्षभर विविध कार्यक्रम होणार आहेत. राम महाराजांचा या परिसरात मोठा अनुयायी वर्ग आहे. अडीच हजार टाळकऱ्यांचा संच त्यांचेकडे आहे. वै. विठ्ठल महाराज घुले, वै.नारायण महाराज झिंजूर्के , तसेच गुरुवर्य शांती ब्रह्म मारूती महाराज कुऱ्हेकर, आदींचे आशिर्वाद त्यांना लाभले आहेत.

राम महाराजांच्या प्रेरणेने या भागात स्थापन झालेल्या ठिकठिकाणच्या भक्ती पिठातील कार्यकर्ते, नंदकिशोर महाराज खरात, विष्णु महाराज नजन, राजाराम महाराज काटे, शेखर महाराज मुरदारे, रविंद्र महाराज काटे तसेच असंख्य कार्यकर्ते या नव्या विक्रमासाठी सज्ज झाले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)