शेवगावमध्ये आ.कदम यांच्या पुतळ्यावर ‘जोडे मारो’ आंदोलन

शेवगावः मुलींबद्दल अपशब्द वापरुन स्त्रियांचा अनादर केल्याच्या निषेधार्थ आ. राम कदम यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर जोडेमारो आंदोलन करण्यात आले. (छायाचित्र-भागवत बागडे)

शेवगाव – भाजपचे आमदार राम कदम यांनी मुलींबद्दल अपशब्द वापरुन जी गरळ ओकली त्याचा शेवगाव राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस, रिपब्लिकन, कम्युनिष्ट पक्षाच्यावतीने निषेध करून आ.कदम यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारो आंदोलन करून त्यानंतर दहन करण्यात आले.

भाजप सरकार सत्तेत आल्यापासून दानवे यांनी शेतकऱ्यांचा अपमान, छिंदम याने शिवरायांचा अपमान, परिचारक यांनी देशासाठी लढणाऱ्या सैनिकांच्या पत्नीचा अपमान, आणि आता चक्‍क भाजपचे आमदार राम कदमांनी मुलींचा अपमान केलेला आहे. त्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस, भारतीय महिला फेडरेशन, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने क्रांती चौकामध्ये कदम यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेश चिरटणीस डॉ. मेधा कांबळे, सामाजिक कार्यकर्त्या वसुधा सावरकर, शुभांगी साळवे, शकीला पठाण, सुनीता कांचन, कमल पुंड, कम्युनिष्ट पक्षाचे राज्य कौन्सिल सदस्य संजय नांगरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे विजय बोरुडे, राजेंद्र मगर, माणिक गायकवाड, कांचन भिसे, भाऊसाहेब मोहिते यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)