शेवगावमध्ये 327 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

शेवगाव – तालुक्‍यात गणपती व मोहरम उत्सवाच्या पार्श्‍वभूमिवर कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, म्हणून 327 जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. यातील 26 गुन्हेगारांना या कालावधीत हद्दपार करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, शेवगावचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी दिली.

येत्या दि. 13 पासुन दहा दिवसाच्या गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे तर दि. 20 मोहरम उत्सव आहे. हे उत्सव शांतंतेत पार पडावेत, म्हणुन या काळात तालुक्‍यातील उपद्रवी समाजकंटकाविरुद्ध शेवगाव पोलीसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. ठार मारण्याचा प्रयत्न, दरोडा, बलात्कार, छेडछाड असे गुन्हे दाखल असणाऱ्या 130 व्यक्‍ती, मारामारी, बेकायदेशीर जमाव, दहशत करणे अशा स्वरूपाचे गुन्हे असणाऱ्या 166 व्यक्‍ती, मुंबई दारूबंदी अधिनियम अंतर्गत 5 व्यक्‍तीविरुद्ध सुध्दा कारवाई करण्यात आली.

ह्या व्यतिरीक्‍ती गंभीर गुन्ह्यातील प्रकाश घोरतळे (बोधेगाव), श्रीमंत गव्हाणे, रामेश्वर ठुबे, त्रिबंक रक्‍टे, मंगेश राजेभोसले (मुंगी), शंकर छाजेड (बालमटाकळी), दिगबंर भारस्कर (जुने दहिफळ), रामभाऊ गुंजाळ, विष्णू पवार (दहिगाव), मोसेस वाघमारे, भाऊसाहेब उर्फ मधुकर वाघमारे, ज्ञानेश्वर कर्डिले (देवटाकळी), संजय थोरात (भाविनिमगाव), अंबादास राजगुरु, खवल्या गायकवाड, शरद गायकवाड, राजु गायकवाड (वरुर), प्रकाश भारस्कर, ईश्वर मगर, अमोल खंडागळे, अमोल तुजारे, शिवाजी मगर, आकाश मोहिते, विजय मोहिते, अक्षय साळवे, अभि कुसळकर (शेवगाव) या 26 जणांना या कालावधीत हद्दपार करण्यात आले आहे.

गणेशोत्सव काळात महसुल कर्मचारी, पोलीस मित्र, पोलीस, शांतता समिती सदस्य, स्वयंसेवकांची एक समिती गठीत केली आहे. प्रशासन व गणेश मंडळांचे संबध दृढ व्हावेत तसेच विसर्जन मिरवणुकीत व्यत्यय येणार नाही. याची दक्षता घेण्यास या समितीने सहकार्य करावे अशा सूचना समिती सदस्यांना देण्यात आल्याचे गुप्तवार्ता निभागाचे राजू चव्हाण यांनी यावेळी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)